Vat Purnima Wisehs in Marathi Dainik Gomantak
देश

Vat Purnima Wisehs in Marathi: शक्ती, प्रेम आणि सौंदर्याचा उत्सव... वट पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा

Vat Purnima 2025 Wisehs in Marathi: भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि धार्मिक सण म्हणजे वट पौर्णिमा. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यात साजरा होणारा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत श्रद्धेचा दिवस मानला जातो.

Sameer Amunekar

Vat Purnima Wisehs in Marathi

भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि धार्मिक सण म्हणजे वट पौर्णिमा. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यात साजरा होणारा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत श्रद्धेचा दिवस मानला जातो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात.

वट पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

वट पौर्णिमेच्या सणाचा उल्लेख महाभारतातदेखील आहे. सती सावित्रीच्या उपाख्यानाशी या सणाचे घट्ट नाते आहे. सावित्रीने आपल्या पती सत्या‍वानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले, ही कथा भारतीय स्त्रियांमध्ये श्रद्धेचा विषय आहे. याच कारणामुळे विवाहित स्त्रिया वटवृक्षाला सात फेरे मारून, उपवास करून वटसावित्रीचे व्रत करतात.

वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून खालील गोष्टी करतात.

  1. सकाळी उपवासाची सुरुवात

  2. वटवृक्षाजवळ जाऊन त्याचे पूजन – कुंकू, फुलं, अक्षता, साखर, पाणी अर्पण

  3. वडाच्या झाडाभोवती कापसाचा धागा गुंडाळून सात फेरे

  4. सावित्री-सत्यवानाची कथा ऐकणे किंवा वाचन

  5. आपल्या पतीच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेणे

या दिवशी काही स्त्रिया संपूर्ण दिवस उपवास करतात. वट पौर्णिमेनिमित्त २० सुंदर आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश दिले आहेत, जे तुम्ही मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा जोडीदाराला पाठवू शकता.

  • वडाच्या झाडासारखं नातं दृढ राहो, प्रेम व विश्वासाने जीवन फुलो!
    वट पौर्णिमेच्या मंगल शुभेच्छा!

  • नात्यातील प्रेम, विश्वास आणि सहकार्याचं हे प्रतीक…
    वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  • तुमचं नातं वटवृक्षासारखं मजबूत, दिर्घकाळ टिकणारं आणि छायादार राहो!
    शुभ वट पौर्णिमा!

  • सौभाग्य, समृद्धी आणि प्रेम तुमच्या आयुष्यात सदैव नांदू दे…
    वट सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • आजच्या दिवशी सावित्रीसारखी नारीशक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये जागृत होवो!
    वट पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • सावित्रीसारख्या तुझ्या प्रेमाने आयुष्य सुंदर केलंस…
    वट पौर्णिमेच्या प्रेमळ शुभेच्छा!

  • तुझ्यासाठी मी नेहमीच सावित्रीचा सत्यवान…
    आपल्या नात्याला वटवृक्षासारखी घट्ट वीण लाभो. शुभ वट पौर्णिमा!

  • तुझं प्रेम हेच माझं बळ आहे…
    वट पौर्णिमेच्या शुभेच्छा, प्रिय पत्नी!

  • आपल्या प्रेमाच्या गोष्टीला काळाच्या प्रवाहात अमरत्व लाभो…
    वट पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • तुझं अस्तित्वच माझ्या जीवनाचा आधार आहे.
    वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, प्रियते!

  • प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक असलेला हा दिवस मंगलमय ठरो!
    शुभ वट पौर्णिमा!

  • जिथे प्रेम, निष्ठा आणि विश्वास आहे तिथे देव आहे!
    वट पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • साजरा करूया आज नात्यांचा पवित्र उत्सव…
    वट पौर्णिमा आनंददायी ठरो!

  • श्रद्धा, निष्ठा, आणि प्रेम याचं प्रतीक म्हणजे वट पौर्णिमा…
    सर्वांना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • वटसावित्रीची गाथा आजही प्रेरणादायी आहे…
    शक्ती, प्रेम आणि सौंदर्याचा उत्सव – शुभ वट पौर्णिमा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

बाथरुममध्ये ढसाढसा रडला होता विराट कोहली; युजवेंद्र चहलने सांगितला वर्ल्ड कपमधील ‘त्या’ पराभवाचा किस्सा!

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Kidney Infection: किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय!

SCROLL FOR NEXT