Gyanvapi Masjid Case Update Dainik Gomantak
देश

Gyanvapi Case: जिल्हा न्यायाधीशांचा मोठा निर्णय, 'शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही'

Gyanvapi Verdict: हिंदू पक्षाची याचिका फेटाळून लावत कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

Gyanvapi Carbon Dating: ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय देताना हिंदू पक्षाची याचिका फेटाळून लावत कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नसल्याचे सांगितले. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. ए. के. विश्वेश यांनी गेल्या आठवड्यात सुनावणी केल्यानंतर ज्ञानवापी मशीदीमध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या तपासावर आणि एएसआयच्या संपूर्ण कॉम्प्लेक्सच्या सर्वेक्षणाच्या मागणीवरील निर्णय राखून ठेवला होता.

कार्बन डेटिंगवरुन हिंदू पक्षात मतभेद

कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत न्यायालयाच्या (Court) आदेशापूर्वीच हिंदू पक्षात फूट पडली. वास्तविक, फिर्यादी क्रमांक एक राखी सिंह यांनी कार्बन डेटिंगला कडाडून विरोध केला आहे. सिंह यांचे वकील विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह 'विसेन' यांनी कार्बन डेटिंग करुन हिंदूंच्या (Hindu) भावना दुखावल्याचा आरोप केला.

तसेच, कार्बन डेटिंगमुळे शिवलिंगाचे नुकसान होईल, अशी त्यांची धारणा आहे. तर फिर्यादी क्रमांक 02 ते 05 यामध्ये लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांची नावे आहेत. त्यांनी न्यायालयात अर्ज करुन कार्बन डेटिंगची मागणी केली आहे.

दुसरीकडे, कार्बन डेटिंगच्या तपासावर प्रामुख्याने दोन मुद्यांवर दाखल केलेल्या दाव्यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. पहिला आक्षेप त्याच्या मौलिकतेवर आहे. या प्रकरणाचा मूळ प्रकरणाशी संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरा, जे शिवलिंग असल्याचे सांगितले जात आहे, ते वुझुखानामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT