Vaibhav Suryavanshi Century Dainik Gomantak
देश

Syed Mushtaq Ali Trophy: 7 चौकार, 7 षटकार! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'मास्टरक्लास', शतक झळकावत रचला इतिहास

Vaibhav Suryavanshi Century: सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा त्याच्या प्रतिभेची चमक दाखवली आहे.

Sameer Amunekar

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा त्याच्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात या तरुण फलंदाजाने स्फोटक खेळी साकारत शतक झळकावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे सामना रंगतदार झाला असून, घरगुती स्पर्धेत त्याचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.

या सामन्यात वैभवने अवघ्या ६१ चेंडूत १०८ धावा केल्या. त्याच्या डावात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्याने सीमारेषेबाहेर सात चौकार आणि तितक्याच षटकारांचा फटका लगावला.

केवळ चौकारांवरच ७० धावा करून त्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. सलग पडणाऱ्या विकेट्सच्या दरम्यानही तो क्रीजवर ठाम उभा राहिला आणि बिहारचा स्कोअर १७६ धावांपर्यंत नेण्यात त्याची निर्णायक भूमिका होती.

या शतकासह वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. बिहारकडून खेळणाऱ्या या खेळाडूने अवघ्या १४व्या वर्षी केलेला हा पराक्रम भारतीय क्रिकेटमधील नवा इतिहास ठरला आहे. त्याची ही खेळी ही गेल्या १६ डावांमधील तिसरी टी-२० शतकी खेळी आहे, ज्यातून त्याची सातत्यपूर्ण कामगिरी स्पष्ट दिसून येते.

२०२५ मध्ये सर्वाधिक टी-२० शतके झळकावण्याच्या बाबतीत वैभवने आता अभिषेक शर्माची बरोबरी केली आहे. दोघांच्याही खात्यात प्रत्येकी तीन शतके जमा झाली आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना वैभवने फक्त ३२ चेंडूत शानदार शतक ठोकत क्रिकेटप्रेमींना थक्क केले होते.

वैभवच्या सलग दमदार कामगिरीमुळे सोशल मीडियावरही उत्साहाचे वातावरण आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आणि जाणकार त्याला भारताचा "पुढचा सुपरस्टार" म्हणू लागले आहेत. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी अशी प्रभावी कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी आशादायी प्रतिभा म्हणून उदयास येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Feast: गोव्याची 'सांस्कृतिक एकता' दर्शवणारा सण! CM सावंतांनी भाविकांना दिल्या फेस्ताच्या शुभेच्छा

Curti ZP Election: 'रवी नाईक' यांचे कार्य पुढे नेणार! रितेश यांचे प्रतिपादन; कुर्टीत भाजपचे प्रितेश गावकर यांचा प्रचार सुरू

Goa Politics: ‘गोंयकारपण’ सांभाळण्यासाठी फॉरवर्ड कटिबद्ध! सरदेसाईंचे आश्वासन; मयेवासीयांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास भाजपला अपयश आल्याचा दावा

Goa Live News: लाटंबार्सेत भाजप उमेदवाराचे शक्तीप्रदर्शन; पद्माकर मळीक यांच्या प्रचारकार्याला श्रीगणेशा

गोव्यात 'दीपवीर'चा शाही अंदाज! चुलत भावाच्या लग्नाला लावली हजेरी, सून दीपिकाने पार पाडल्या जबाबदाऱ्या; Video Viral

SCROLL FOR NEXT