Vaibhav Suryavanshi angry video Dainik Gomantak
देश

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Vaibhav Suryavanshi angry video: वैभव सूर्यवंशी सहसा शांत असल्याचे दिसून येते, परंतु ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अचानक रागावला.

Sameer Amunekar

भारताचा १९ वर्षांखालील (U-19) संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी यावेळी फारशी चमक दाखवू शकला नाही आणि तो स्वस्तात माघारी परतला. परंतु, त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीवरून मोठा वाद निर्माण झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याच्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज चार्ल्स लेचमंड चेंडू टाकत होता. त्याच्या एका चेंडूवर वैभवने संरक्षणात्मक फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू विकेटकीपर अॅलेक्स ली यंगच्या हातात गेला. त्यानं झेल घेताच पंचांनी वैभवला झेलबाद ठरवले. मात्र वैभवला या निर्णयावर विश्वास बसला नाही. त्याचा दावा होता की, चेंडू त्याच्या बॅटला न लागता मांडीवर आदळला आहे, त्यामुळे आपण बाद नाही.

मैदानावरच्या दृश्यांनुसार, वैभव पंचांच्या निर्णयानंतर काही क्षणांसाठी मैदानातच उभा राहिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो पंचांशी काहीतरी बोलताना दिसतो. त्यानंतरही तो डगआउटकडे जाण्यापूर्वी काहीसे नाराजपणे पंचांशी चर्चा करताना दिसला. त्याचवेळी नॉन-स्ट्राईक एंडवर उभा असलेला वेदांत त्रिवेदी देखील पंचांशी काही बोलताना दिसला. तथापि, पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि वैभवला अखेर मैदान सोडावे लागले.

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ १४ चेंडूंत २० धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला, पण मोठी खेळी करण्यापूर्वीच त्याला माघारी परतावे लागले.

याआधीच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपली आक्रमक फलंदाजी दाखवत शानदार शतक (११३ धावा) झळकावले होते. त्या कामगिरीमुळे तो चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र या वेळेस केवळ २० धावांवर बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Goa News Live: खाणकाम मोफत मिळालेले नाही..., अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

SCROLL FOR NEXT