Vaibhav Sooryavanshi Dainik Gomantak
देश

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Vaibhav Sooryavanshi Big Statement: भारताच्या १९ वर्षांखालील संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या युवा एकदिवसीय सामन्यात केवळ ७८ चेंडूत १४३ धावांची तुफानी खेळी केली.

Sameer Amunekar

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या युवा एकदिवसीय सामन्यात केवळ ७८ चेंडूत १४३ धावांची तुफानी खेळी करत विक्रमी शतक झळकावले. या शानदार कामगिरीसह तो युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.

सामन्यानंतर बीसीसीआयच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना सूर्यवंशीने आपल्या खेळीमागील प्रेरणा स्पष्ट केली. तो म्हणाला, शुभमन गिलकडून मला खूप प्रेरणा मिळाली. त्याचा खेळ मी पाहिला आणि लक्षात आलं की १०० किंवा २०० धावा केल्यानंतरही तो कोणत्याही दबावाशिवाय सहजतेने खेळतो. त्याची ती शांतता आणि आत्मविश्वास मला भावला."

दरम्यान, भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल याने बर्मिंगहॅममध्ये पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात २६९ तर दुसऱ्या डावात १६१ धावांची अफलातून खेळी साकारली होती. त्याचवेळी भारताचा १९ वर्षांखालील संघ एजबॅस्टनमध्ये होता, जिथे सूर्यवंशी आपली विक्रमी खेळी करत होता.

आगामी सामन्यांविषयी बोलताना सूर्यवंशी म्हणाला, "पुढच्या वेळी ५० षटकं पूर्ण खेळण्याचा आणि २०० धावा करण्याचा प्रयत्न करेन. मी जितका जास्त खेळू शकेन, तितकं माझ्या संघाला फायदा होईल."

विशेष म्हणजे, सूर्यवंशीला त्याच्या विक्रमाची कल्पना ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतरच झाली. "मला माहित नव्हतं की १०० धावा केल्यानंतर मी रेकॉर्ड केला आहे. आमचे संघ व्यवस्थापक अंकित सर यांनीच मला सांगितलं आणि सर्वांनी अभिनंदन केलं," असंही त्यानं पुढे सांगितलं. भारताच्या युवा संघातील या कामगिरीमुळे सूर्यवंशीकडून भविष्यातील सामन्यांमध्ये मोठ्या आशा बाळगल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT