
बार्देश: बार्देश तालुक्यातील नास्नोळा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूता स्थानिकांची दुकाने असून त्याच्यावरच त्यांची रोजीरोटी चालते. हा रस्ता २५ मीटर करताना त्यांची दुकाने काढून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे नास्नोळा पंचायत क्षेत्रातील रस्ता १२ मीटरच ठेवावा, असा ठराव नास्नोळा बार्देश पंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत सदस्य सतीश गोवेकर यांनी स्थानिक पत्रकारांना दिली.
नास्नोळा सरपंच नीतेश केरकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी झालेल्या ग्रामसभेला पंचायत सदस्य सतीश गोवेकर, गोविद गोवेकर, फ्रेडी फर्नाडिस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नास्नोळा पंचायत क्षेत्रात कोमुनिदादच्या जागेत ३०० बेकायदेशीर घरे आहेत. ३७२ कलमानुसार कोमुनिदादमध्ये त्यांच्या फाईल्स पडून आहेत.
आता सरकार विधानसभेत नवीन कायदा आणत असून त्या घरांना कायदेशीर मान्यता देणार आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र आमच्या या फाईल्स अद्याप का पडून आहेत, असा प्रश्न गोवेकर यांनी उपस्थित केला. आमची घरे आम्हाला मिळावीत यासाठी ग्रामस्य एकटावले असून कोमुनिदादमध्ये ज्या फाईल्स पडून आहेत त्या हातावेगळ्या करून आम्हाला न्याय यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पंचायत सदस्य गोविंद गोवेकर यांनीही नास्नोळावासीयांना न्याय द्यावा अशी मागणी केली. सरपंच नीलेश केरकर यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
सरकार विधानसभेत नवीन कायदा आणत असून त्या घरांना कायदेशीर मान्यता देणार आहे. आम्ही कोमुनिदाद प्रशासकाला पत्रव्यवहार केला आहे. आम्ही भयभीत झालो असून ही घरे कायदेशीर करावीत, अशी मागणी, ग्रामस्थांनी केली.
१९७२ पूर्वी जी घरे, दुकाने वा इतर व्यवसाय आहेत त्यांना प्रमाणपत्रे दिली जातील. मुख्यमंत्र्यांच्या घरे कायदेशीर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सरकारला पाहिजे तर काहीही होऊ शकते, असे सतीश गोवेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.