Salcette: रावणफोंड येथील रेल्वे पुलाचा जोडरस्ता हरवला झुडपात...! पादचाऱ्यांच्याही जिवाला धोका, झुडपे हटविण्याची नागरिकांची मागणी

Ravanfond railway road issue: मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे रावणफोंड रेल्वे पुलाच्या एका बाजूचा कठडा कोसळला होता व कित्येक दिवस हा रस्ता एकतर्फी करण्यात आला होता.
Salcette
SalcetteDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे रावणफोंड रेल्वे पुलाच्या एका बाजूचा कठडा कोसळला होता व कित्येक दिवस हा रस्ता एकतर्फी करण्यात आला होता. आताही या पुलावरून वाहतूक सुरू असली तरी अवजड वाहनांना बंद करण्यात आला आहे. आता या पुलाच्या दोन्ही बाजूनी झुडुपे वाढलेली आहेत. त्यामुळे पादचारी व वाहन चालकांना त्रास होऊ लागला आहे.

या झुडुपांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने जास्त करून रात्रीच्या वेळी समोरून कोण येत आहे, हे वाहन चालकाला दिसत नाही. त्याचप्रमाणे या झुडुपांत साप, सरडे असण्याची शक्यता असल्याने पादचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. त्यामुळे सुद्धा वाहन चालकांना त्रास संभवतो व अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काही नागरिकांनी सांगितले की, मे २०२३ रोजी सहा पदरी पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. पण हे काम कोठपर्यंत पोहोचले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. किमान प्रशासनाने झुडुपे कापून हा रस्ता स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

Salcette
Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

या सहा पदरी रेल्वे उड्डाण पुलासाठी व जोड रस्त्यासाठी ५४ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सध्या पुलाचे काम प्राथमिक स्तरावर आहे, असे सांगण्यात येत आहे.

रस्‍ता वाहतुकीसाठी मोकळा करा : आप

रावणफोंड येथील रेल्‍वे उड्डाण पुलावर जी झुडपे वाढली आहेत, ती साफ करून हा रस्‍ता वाहने आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा राज्‍य संयुक्‍त सचिव प्रशांत नाईक यांनी केली आहे. सध्‍या या रस्‍त्‍यावरून फक्‍त हलकी वाहने सोडली जातात. सर्व प्रकारच्‍या वाहनांसाठी हा रस्‍ता कधी खुला होणार हे प्रशासनाने स्‍पष्‍ट करावे. अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Salcette
Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

या मार्गावरुन प्रवासी वाहने जात नाहीत त्‍यामुळेच लोकांना पायी चालत जावे लागते. या पुलावर झुडपे वाढल्‍याने त्‍यात साप आणि इतर प्रकारची जीवाणू असल्‍यास या पादचाऱ्यांना ती चावू शकतात. तसेच या भागात झाडी वाढल्‍याने ती खाण्‍यासाठी भटकी गुरेही येत असल्‍याने त्‍यामुळेही पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्‍हणून या पुलावरून प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com