Viral Video: गुजरातच्या वडोदरा नवरात्री महोत्सवात (Navratri celebrations) नवरात्रौत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून हजारो भाविक गरबा खेळताना दिसत आहेत. या गरब्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंधांचे सावट होते. यंदा मात्र मुक्तपणे सण साजरे करण्याची संधी मिळाल्याने लोक अमाप उत्साहात आहेत.
वडोदरा नवरात्री महोत्सव (व्हीएनएफ) येथील गरब्याचे ड्रोन कॅमेऱ्याने केलेल्या चित्रिकरणाचे फुटेज सध्या व्हायरल झाले आहे. यात असंख्य लोक गरबा खेळताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे गरब्यात गोल फिरताना त्यांचा ताळमेळ इतका जबरदस्त जमला आहे की, ते पाहताना सुरेख वाटते.
या व्हिडिओला हजारो व्ह्युज मिळाले असून नेटकऱ्यांकडून त्यावर कौतूकाच्या कमेंट केल्या जात आहेत. गरबा हा नृत्यप्रकार गुजरातचे वैशिष्ट्य मानला जातो. नवरात्र उत्सवाच्या काळ्यात गुजरातसह इतरही राज्यांमध्ये आता गरब्याची धुम दिसून येते. काही दिवसांपुर्वीच मुंबईतील लोकल ट्रेनमधील महिल्यांच्या गरब्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याला लाखो व्हयुज मिळाले होते.
दरम्यान, गुजरात विधानसभेची आगामी निवडणूक आम आदमी पक्षाने चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच 'आप'चे सर्व प्रमुख नेते अलीकडच्या काळात सातत्याने गुजरात दौरा करत आहेत. आताही पंजाबमधील 'आप'च्या सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा हे गुजरात दौऱ्यावर आले आहेत.
भगवंत मान यांनी राजकोट येथील एका कार्यक्रमात मंचावर गरब्यात भाग घेतला. तर खा. राघव चड्ढा हे वडोदरा येतईल 'आप'च्या एका कार्यक्रमात गरबा नृत्यामध्ये सहभागी झाले. चड्ढा यांनी गरब्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे देखील गुजरातमध्ये आहेत. केजरीवाल आणि मान यांनी गुजरातमधील चार सभांना संयुक्तरित्या संबोधित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.