Uttarakhand rains: Rani Pokhari Bridge collapses on Dehradun-Rishikesh highway Dainik Gomantak
देश

Video : डेहराडून- ऋषिकेशला जोडणारा पूल कोसळला

गेल्या 48 तासांपासून पावसामुळे डेहराडूनमध्ये (Uttarakhand Rain) हाहाकार माजला आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या 48 तासांपासून पावसामुळे डेहराडूनमध्ये (Uttarakhand Rain) हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे राणी पोखरीजवळ (Rani Pokhari Bridge) डेहराडून- ऋषिकेश (Dehradun-Rishikesh highway) पूल कोसळला आहे. हा पूल सकाळी 10.30 च्या सुमारास कोसळला असून त्यावेळी पुलावरून अनेक वाहने जात होती. अनेक वाहने वाहून गेल्याच्याहि समजते आहे . पूल तुटल्याने अनेक गाड्या त्याखाली अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटने नंतर डेहराडून आणि ऋषिकेश मधील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. (Uttarakhand rains: Rani Pokhari Bridge collapses on Dehradun-Rishikesh highway)

राणीपोखरीचे एसएचओ जितेंद्र चौहान यांनी सांगितले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे . नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या मध्यभागी असलेला भाग पूर्णपणे खराब झाला होता . घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बचाव कार्य सुद्धा जोरदार चालू आहे.

पुलाच्या मध्यभागी अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा पुल कोसळल्याने गढवाल विभागाची राजधानी आणि विमानतळाला जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. देहरादूनला जाणारे कोणतेही वाहन आता नेपाळी फार्म बाया भानियाद्वारे पाठवले जात आहे.

अजूनही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तराखंडच्या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये नैनीताल, चंपावत, उधम सिंह नगर, बागेश्वर आणि पिथोरागड यांचा समावेश आहे.ड यांचा समावेश आहे. याशिवाय, डेहराडून, टिहरी, पौडी जिल्ह्यांच्या काही भागात पावसाची शक्यता लक्षात घेता, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT