देशात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असतानाच एक चिंतेची बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry Of India) महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले असून त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबत साजरी करावी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक असल्याचे मतही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (Alert: Covid19 positive cases again rising in India)
“कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत देशातील अनेक ठिकाणी सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येत आहे . त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे”, असे मत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले आहे तसेच लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक असल्याचे मत देखील त्यांनी मांडले आहे.
त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे की, सध्या देशात 44 जिल्हे आहेत जिथे कोरोना विषाणूच्या केस पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोरामसह इतर राज्यात आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक काळजीने राहणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.