uttar pradesh pratapgarh kunda story 17 lakh stolen by making teacher and dog unconscious Dainik Gomantak
देश

शिक्षक आणि कुत्र्याला बेशुद्ध करून केली 17 लाखांची चोरी

जिष्णेंद्र प्रताप सिंह हे जहाँईपूर येथील मॉडेल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत.

दैनिक गोमन्तक

लोखंडी ग्रील कापून चोरट्यांनी घरात झोपलेल्या शिक्षकाला आणि त्यांच्या कुत्र्याला औषध फवारणी करून बेशुद्ध केले. दोन कपाटे व बॉक्स फोडून चोरट्यांनी 75 हजारांची रोकड व सुमारे 16 लाखांचे दागिने चोरून नेले.सकाळी माहिती मिळताच शहर कोतवाल यांच्यासह सीओ सिटी, एएसपी पूर्व आणि फील्ड युनिटचे लोकही घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. या घटनेची फिर्याद शिक्षकाने दिली आहे.(uttar pradesh pratapgarh kunda story 17 lakh stolen by making teacher and dog unconscious)

नगर कोतवालीच्या दिहवा भूपियामाऊ येथील रहिवासी जिष्णेंद्र प्रताप सिंह हे जहाँईपूर येथील मॉडेल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. जिष्णेंद्र हे गुरुवारी रात्री खोलीत झोपले होते. घरात पाळीव कुत्राही होता. छताचे व शिडीचे ग्रील कापून घरात घुसलेल्या चोरट्यांनी जिष्णेंद्र व त्यांच्या कुत्र्यावर बेशुद्ध रसायन फवारले. दोघेही बेशुद्ध झाल्यानंतर चोरट्यांनी दोन कपाटे, बॉक्स फोडून 75 हजारांची रोकड व दागिने असा सुमारे 16 लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला.

तेथून जाताना चोरट्यांनी जिष्णेंद्र यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. सकाळी जिष्णेंद्रला शुद्धीवर आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडला. माहिती मिळताच सिटी कोतवाल रवींद्र नाथ राय, सीओ सिटी अभय पांडे, एएसपी पूर्व सुरेंद्र प्रताप सिंह हे फील्ड युनिटच्या लोकांसह पोहोचले आणि तपास केला. फील्ड युनिटच्या लोकांनी चोरट्यांच्या बोटांचे ठसे गोळा केले. या घटनेची तक्रार प्राप्त झाल्याचे शहर कोतवाल यांनी सांगितले. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT