uttar pradesh lucknow up election result 2022 munawwar rana falls ill amid up Dainik Gomantak
देश

यूपी सोडण्याची केली होती घोषणा; 'हा' नेता आश्वासनावर राहणार ठाम?

..पण येत्या पाच वर्षांत योगी आले तर आम्ही वाचणार नाही

दैनिक गोमन्तक

यूपी निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर उत्तर प्रदेश सोडणार असल्याचे सांगणारे प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली आहे. यूपी निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुनव्वर राणा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने ते घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुनव्वर राणा आपल्या आश्वासनावर ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात पुन्हा भाजपचे (BJP) सरकार आल्यास उत्तर प्रदेश (UP) सोडेन, असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी जाहीरपणे केले होते. प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा म्हणाले होते की, पाच वर्षांत आमचा उद्धार झाला, पण येत्या पाच वर्षांत योगी आले तर आम्ही वाचणार नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू असताना गुरुवारी एका कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला. मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टी (BSP) कार्यकर्ता अंकित यादव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. गाझियाबाद शहर विधानसभेच्या मतमोजणी केंद्रावर ही घटना घडली.

गाझियाबादमधून भाजपने अतुल गर्ग यांना गाझियाबाद (Ghaziabad) शहर विधानसभा मतदारसंघातून, काँग्रेसने सुशांत गोयल, बसपा कृष्ण कुमार आणि समाजवादी पक्षाने विशाल वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये या जागेवरून भाजपचे अतुल गर्ग विजयी झाले होते. 54.92 टक्के मतदान झाले जाहिराती या विधानसभा निवडणुकीत गाझियाबाद जिल्ह्यात 54.92 टक्के मतदान झाले. मोदीनगरमध्ये सर्वाधिक तर साहिबााबादमध्ये सर्वात कमी मतदान झाले. गाझियाबादमध्ये 51.57 टक्के, लोणीमध्ये 61.49 टक्के, मोदी नगरमध्ये 67.36 टक्के, मुरादनगरमध्ये 59.72 टक्के, साहिबाबादमध्ये 47.03 टक्के मतदान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT