Jhansi Incident News Dainik Gomantak
देश

समोर बायकोचा मृतदेह, डोळ्यात हतबलता अन् 8 वर्षांच्या चिमुकलीचा आक्रोश! अखेर खाकीतील 'देवदूत' आला धावून; झाशीतील घटनेनं खळबळ

Jhansi Incident News: उत्तर प्रदेशातील झाशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधून आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढणारी आणि अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Jhansi Incident News: उत्तर प्रदेशातील झाशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधून आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढणारी आणि अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील नकटा गावचे रहिवासी राहुल आदिवासी यांच्या पत्नी रामवती अनेक दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक रुग्णालयात प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले.

अत्यंत गरिबीत जगणाऱ्या राहुल यांनी कसाबसा पैशांचा मेळ घालून टॅक्सीने पत्नीला आणि आपल्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला घेऊन मेडिकल कॉलेज गाठले. परंतु, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी रामवती यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या राहुल यांच्यासमोर पत्नीचा मृतदेह गावी कसा घेऊन जायचा, हा सर्वात मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला.

मृतदेह घरी नेण्यासाठी पुरेसे पैसे आणि कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने हतबल झालेला पती आणि त्याची निष्पाप मुलगी नंदिनी स्ट्रेचरवर ठेवलेल्या मृतदेहासोबत रुग्णालयातील (Hospital) वाहन पार्किंगच्या छताखाली बसून राहिले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत स्ट्रेचरवर आईचा मृतदेह पाहून ती चिमुकली मुलगी ढसाढसा रडत होती. तब्बल तासभर बाप-लेक अश्रू ढाळत कोणीतरी मदतीला येईल या आशेने वाट पाहत होते, परंतु वैद्यकीय प्रशासनातील कोणाचेही या गंभीर परिस्थितीकडे लक्ष गेले नाही.

तब्बल एका तासानंतर तेथून जाणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पोलिसाची नजर या हताश कुटुंबावर पडली. त्याने तत्परतेने जवळ जाऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती आणि हतबलता समजताच त्या पोलिसाने स्वतः पुढाकार घेत तातडीने खाजगी ॲम्ब्युलन्सची सोय केली आणि मृतदेह सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पाठवून दिला.

रुग्णालयाचे सीएमएस डॉ. सचिन माहूर यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ज्यांच्याकडे व्यवस्था नसते त्यांना रुग्णालयाकडून रुग्णवाहिका दिली जाते; परंतु या कुटुंबाने कदाचित कर्मचाऱ्यांना आपली समस्या सांगितली नसावी. नुकतीच झारखंडमधील गुमला येथे वेळत रुग्णवाहिका न मिळाल्याने एका नववीत शिकणाऱ्या मुलीचा आई-वडिलांच्या मांडीवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती, आणि आता झाशीतील या घटनेने संपूर्ण देशाला पुन्हा एकदा हादरवून सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT