लखनऊ: दिवाळीनिमित्त अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांना मोठी भेट दिली आहे. अखिलेश म्हणाले, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काकांचा पक्ष सपा आणि सर्व लहान आणि प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काकांचा पूर्ण आदर करतो, आम्ही काकांना जास्तीत जास्त मान देऊ. भाजप सरकारमध्ये महागाईने सर्वजण हैराण आहेत. प्रत्येक गोष्टीत महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकरी, तरुण सर्वच चिंतेत आहेत. भाजप सरकार (BJP government) शेतकऱ्यांना खतेही देऊ शकत नाही. मुख्यमंत्री योगी हे या आधी सपा सरकारने सुरु केलेल्या कामांचे उद्घाटन करत आहेत.
यूपीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काका-पुतण्यांमध्ये लढत आहे. मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही प्रतिक्षा संपू शकते. असे सांगण्यात येत आहे. शिवपाल नेताजींच्या वाढदिवसाकडे शेवटची आशा म्हणून पाहत होते, जो 22 नोव्हेंबरला आहे. त्याआधीच अखिलेश यांनी युतीची घोषणा करून सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
कानपूरमधून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मथुरा वृंदावनमधून त्यांचे काका शिवपाल यादव यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता दोघेही वेगवेगळ्या वाटेवरून चालत आहेत. काका-पुतण्याची समांतर धावणारी गाडी 22 नोव्हेंबरला एकाच फलाटावर थांबणार का, असा प्रश्नही कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होत होता, मात्र अखिलेश यांनी आता शिवपाल यांच्यासोबत जाण्याची घोषणा केली आहे.
याआधी उत्तर प्रदेशात असा काळ होता, जिथे समाजवादी पक्षापासून ते सरकारपर्यंत शिवपाल यादव यांचा उद्दामपणा दिसून येत होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांच्यापासूनचे अंतर वाढले आणि त्यानंतर त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. मात्र, त्यांच्या जवळचे सर्व नेते समाजवादी पक्षात उपेक्षित राहिले किंवा शिवपाल यांच्या पक्षाचे सदस्यत्व घेतले.
असे मानले जात होते की शिवपाल सिंह यादव हे स्वत: सपामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि इतर लहान पक्षांना देखील ते सामील करु इच्छित आहेत. शिवपाल यादव त्यांच्या दौऱ्यात सपाशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत. प्रवासादरम्यान त्यांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत. प्रस्पाला किती दर्जा द्यायचा यावरही मंथन सुरू झाल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री आणि यादव परिवाराचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचीही तयारी सुरू असून, त्यात शिवपाल यादव येणार असल्याचीही चर्चा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.