'सरकार विरोधात बोलाल तर... ' अखिलेश यादवांचा योगी सरकारवर हल्लाबोल

अखिलेश यांनी भाजप महागाई थांबवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आली होती, पण आता सकाळच्या चहापासून सर्व काही अधिक महाग झाले आहे अशी टीका देखील केली आहे.
Akhilesh Yadav attacks on Yogi Adityanath government
Akhilesh Yadav attacks on Yogi Adityanath government Dainik Gomantak

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे . सरकारची साडेचार वर्षे पूर्ण झाली पण संपूर्ण राज्यात कुठेही स्वयंपाकघर बांधता आले नाही. एवढच नाही तर शिक्षण क्षेत्रही उध्वस्त झाले आहे रोजगाराच्या नावाखाली काहीही केले नाही. सरकारकडे केलेल्या कामाची यादी आणि आकडेवारीही नाही असा जोरदार हल्ला देखील अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला आहे. (Akhilesh Yadav attacks on Yogi Adityanath government)

त्याचबरोबर नाव न घेता अखिलेश यादव यांनी लखीमपूर खेरीच्या घटनेकडे बोट दाखवत सांगितले की, जर तुम्हीसरकार विरोधात आवाज उठवला तर तुम्हाला टायरने चिरडले जाईल.असा खोचक टोला देखील लगावला आहे तसेच ते म्हणाले की, जेव्हा समाजवादी पार्टीचा जाहीरनामा तयार होईल, तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या कशा सोडवल्या जातील याची काळजी घेतली जाईल.त्याचबरोबर अखिलेश यांनी भाजप महागाई थांबवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आली होती, पण आता सकाळच्या चहापासून सर्व काही अधिक महाग झाले आहे. आज सर्व गरीब मजूर पूर्ण अन्नासाठी भटकत आहेत. अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

तसेच अखिलेश यादव यांनी नुकत्याच आलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्सववरून देखील केंद्र सरकारला देखील घेरण्याचा प्रयन्त केला आहे. ' आज आपला देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळलाही मागे टाकला आहे. आमचे लोक उपाशी झोपत आहेत. भारतातील सर्वात कमी वजनाची मुले, यूपीमधील सर्वाधिक कुपोषित मुले. कारण भाजपचे लोक चुकीच्या मार्गावर आहेत.' असे सांगत केंद्र आणिक राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले आहेत. अखिलेश म्हणाले की हे लोक म्हणतात की ते गहू आणि तांदूळ देत आहेत. शेवटी, तुम्ही काय देत आहात की पोट भरू शकत नाही? सपा सरकारमध्ये आठवड्यातून एक दिवस मुलांना दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आणि सरकारने ते सगळं बंद केलं .

Akhilesh Yadav attacks on Yogi Adityanath government
जम्मू-काश्मीरला सुरक्षा पुरवण्यात केंद्र सरकार अपयशी:कपिल सिब्बल

सरकारची खिल्ली उडवत ते म्हणाले कीसरकार ते एका बाजूला अन्न महोत्सव साजरे करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दहशतवादी आणि मवाली म्हटले जाते.ही सारी सरकारची नौटंकी आहे.

राज्यात निवडणुका झाल्या तेंव्हा आदित्यनाथ यांना माहित नव्हते की ते मुख्यमंत्री होतील. ते बसून पूजा करत होते. भाजपने लगेच त्यांना बोलावून त्यांना मुख्यमंत्री केले. सेवानिवृत्त आयएएस एके शर्मा यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की जे निवृत्त आयएएस उपमुख्यमंत्री बनण्यासाठी आले होते त्यांना बाजूला केले गेले. त्यांना त्यांच्या मनाचे घरही सापडले नाही. असे म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com