Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली. येथे एक व्यक्तीने केवळ 'बुरखा' न घातल्याच्या रागातून आणि बायकोने आपला शब्द पाळला नाही या संशयातून बायको आणि दोन निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या तिघींचेही मृतदेह घराच्या अंगणात असलेल्या सेप्टी टँकच्या खड्ड्यात दफन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. फारुक असे या नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गढी दौलत गावातील रहिवासी असलेल्या फारुकचा 18 वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथील ताहिराशी विवाह झाला होता. त्यांना 5 मुले आहेत. महिनाभरापूर्वी ताहिरा आणि फारुक यांच्यात पैशांवरुन मोठा वाद झाला होता. या वादानंतर ताहिरा बुरखा न घालताच आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. ही गोष्ट फारुकच्या जिव्हारी लागली. "बायको माझा शब्द मानत नाही आणि बुरखा न घालता बाहेर जाऊन माझी इज्जत घालवत आहे," असा संशय त्याच्या मनात घर करुन बसला होता.
काही दिवसांपूर्वी, तो ताहिराला माहेरुन परत घेऊन आला, पण त्याच्या मनात खुनशी विचार सुरुच होते. त्याने हत्येसाठी 3-4 दिवसांपूर्वीच एक गावठी कट्टा खरेदी केला होता. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता फारुकने ताहिराला चहा बनवण्यास सांगितले. ताहिरा स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेली असता, फारुकने मागून येऊन तिच्या डोक्यात गोळी झाडली. तिचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज ऐकून मोठी मुलगी (14 वर्षे) धावत किचनमध्ये आली. आपल्या वडिलांच्या हातात बंदूक आणि आईचा मृतदेह पाहून ती ओरडू लागली. तिने आरडाओरडा करु नये म्हणून फारुकने तिलाही गोळी मारुन संपवले. त्यानंतर आवाज ऐकून जागी झालेली लहान मुलगी (11 वर्षे) तिथे पोहोचली असता, फारुकने क्रूरतेचा कळस गाठत तिचा गळा दाबून तिला ठार केले.
घरात सेप्टी टँकसाठी आधीच एक खड्डा खोदलेला होता. आरोपीने रातोरात तिन्ही मृतदेह त्या खड्ड्यात टाकले आणि त्यावर माती टाकून खड्डा बुजवून टाकला. काही दिवस कोणालाही संशय आला नाही. मात्र, जेव्हा दोन-तीन दिवस सून आणि नातवंडे दिसली नाहीत, तेव्हा फारुकच्या आई-वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी चौकशी सुरु केली.
आरोपीने (Accused) सुरुवातीला "आम्ही दुसऱ्या गावात भाड्याने घर घेतले असून ते तिथे राहायला गेले आहेत," असा बहाणा केला. मात्र, संशय आल्याने त्याचे वडील त्या गावात गेले असता तिथे कोणीच नसल्याचे समोर आले. अखेर वडिलांनीच आपल्या मुलावर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी जेव्हा फारुकला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी (Police) खड्डा खोदून तिन्ही मृतदेह बाहेर काढले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.