Indian Cow 
देश

वृद्ध व्यक्तीचे गाय-श्वान यांच्यासह विविध प्राण्यांवर लैंगिक अत्याचार, UP मधील किळसवाणा प्रकार

याप्रकरणी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीवर गाय आणि श्वान यांच्यासह विविध प्राण्यांवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बारा येथील वृद्ध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विजेंद्र मिश्रा (वय 62, रा. बारा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृद्ध व्यक्ती विरोधात यापूर्वीही अशाप्रकराचे आरोप करण्यात आले आहेत.

"पोलिस तपासादरम्यान, याप्रकरणाशी संबधित आम्हाला अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, ज्यामध्ये मिश्रा सार्वजनिक ठिकाणी विविध प्राण्यांसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहेत." तो मानसिक आजारी आहे आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." अशी माहिती पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आनंद प्रकाश तिवारी यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिली आहे.

यापूर्वी बुलंदशहर मधून अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले होते. यात एका 65 वर्षीय व्यक्तीने पाळीव कुत्र्यासोबत गैरवर्तन केले होते. पाळीव कुत्र्यासोबत केलेल्या गैरकृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

कुत्र्याचा मालक प्रेमचंद वर्मा उर्फ ​​बबली यांनी पोलीस स्टेशन नगर कोतवाली गाठले आणि वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर आरोपी अनिल शर्माला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT