California Plane Crash: कॅलिफोर्नियात विमान क्रॅश होऊन सहा जणांचा मृत्यू, धावपट्टीवर उतरताना लागली आग

या दुर्घटनेत सुमारे एक एकर परिसरातील झाडे जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
California Plane Crash
California Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

California Plane Crash: अमेरिकेत एका विमान दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. लास वेगासहून कॅलिफोर्नियाला जाणारे विमान, लॉस एंजेलिस आणि सॅन दिएगो दरम्यान मुरिएटा शहरातील विमानतळाजवळ विमान कोसळल्याने अपघात झाला. पहाटे 4.15 वाजता हा अपघाता झाला.

अपघातानंतर विमानाला आग लागली यात विमान जळून खाक झाले आहे. विमानातील सर्व सहा जणांना रिव्हरसाइड काऊंटी शेरिफ विभागाने मृत घोषित केले आहे. पण विमान अपघातात मृत झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

सेस्ना C550 असे अपघातग्रस्त विमानाचे नाव आहे. या दुर्घटनेत सुमारे एक एकर परिसरातील झाडे जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डासह यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन या अपघाताची चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने लास वेगासमधील हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहाटे 3.15 वाजता उड्डाण केले. दरम्यान, विमान लँड करताना सर्वत्र धुके पसरले. धावपट्टी स्पष्ट दिसत नाही अशी माहिती पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) ला दिली. दरम्यान, पायलट पुन्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला.

California Plane Crash
Seema Haider : 'मला पाकिस्तानात पाठवू नका, मला मारून टाकतील, मी हिंदू झाली आहे…',प्रियकरासाठी भारतात आलेल्या तरुणीचे योगींना साकडे

NTSB तपास अधिकाऱ्यांनी अपघाताबाबत माहिती दिली आहे. विमानाने सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न ​​केला होता. पण, धावपट्टीच्या 500 फूट आधीच ते कोसळून त्याचा अपघात झाला. एनटीएसबी अपघाताच्या कारणे शोधून काढत आहे.

काही दिवसांपूर्वी देखील येथे विमान अपघात झाला होता. सिंगल-इंजिन सेसना 172 मंगळवारी मुरिएटा येथील फ्रेंच व्हॅली विमानतळावरून टेकऑफ झाल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com