Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची कथितरित्या पशु तस्करांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

उत्तर प्रदेश: गोरखपूरमध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची कथितरित्या गुरांच्या तस्करांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल प्रवेश परीक्षा (NEET) ची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्याच्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गुप्ता नावाच्या या विद्यार्थ्याला तोंडावर गोळी मारण्यात आली, त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यावरुन गाडी चालवून त्याला चिरडले आणि नंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून चार किलोमीटर दूर फेकून दिला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घातला आणि पोलिसांवरही हल्ला केला.

पशु तस्करांनी केले अपहरण

ही घटना सोमवारी (15 सप्टेंबर) दुपारी घडली. पशु तस्करांचा एक समूह तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून एका गावातून जनावरे चोरण्यासाठी आला होता. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यावर दीपक एकटाच त्यांचा पाठलाग करण्यासाठी धावला.

मात्र, गुन्हेगारांनी त्याला पकडले. त्यांनी त्याला जबरदस्तीने त्यांच्या डीसीएम गाडीत बसवले आणि एक तासभर त्याला गाडीत फिरवत राहिले. त्यानंतर त्यांनी त्याची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह फेकून दिला.

ग्रामस्थांचा हिंसक विरोध

विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गोरखपूर-पिपराइच मार्ग जाम केला. सुरुवातीला शांत असलेला हा निषेध नंतर हिंसक झाला. ग्रामस्थांनी एका तस्कराचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.

या हिंसेदरम्यान जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही दुखापत झाली. जखमींमध्ये एस.पी. नॉर्थ जितेंद्र श्रीवास्तव आणि पिपराइच पोलीस ठाण्याचे प्रभारी पुरुषोत्तम आनंद सिंह यांचा समावेश आहे.

ग्रामस्थ दिपकच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचे पोलीस दल आणि प्रांतीय सशस्त्र दल (PAC) घटनास्थळी तैनात करण्यात आले.

पोलीस हत्या आणि त्यानंतर झालेल्या हिंसेचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याचा मृत्यू गोळी लागल्याने नाही, तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

दुसरीकडे, या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली. त्यांनी दोषींवर कठोर आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निर्देश मिळताच जिल्हाधिकारी (डीएम), वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी), उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

Rohit Sharma: फायनलचा थरार... भारतीय महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी 'मुंबईचा राजा' मैदानात Watch Video

SCROLL FOR NEXT