Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Badaun Murder Case: धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलांची निर्घुण हत्या; फरार आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार

Uttar Pradesh Crime: पोलीस ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांसह हिंदू संघटनांचे सदस्य पोहोचले. यावेळी त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अल्पवयीन हिंदू मुलांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. तिसऱ्या मुलाच्याही मानेवर वार करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांसह हिंदू संघटनांचे लोक पोहोचले. यावेळी त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

दरम्यान, मृत मुलांबरोबर निर्ममता दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. साजिद असे दोन्ही मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस (Police) आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (19 मार्च 2024) घडली.

बदायूंच्या सिव्हिल लाइन्समध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आहे. येथील बाबा कॉलनीतील तिसऱ्या मजल्यावर विनोद आपल्या कुटुंबासोबत राहतो. विनोदची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये काम करते. विनोद गाझीपूरमध्ये पाण्याच्या टाकीचे कंत्राटदार म्हणून काम करतो. घटनेच्या वेळी तो घराबाहेर होता. त्याची तिन्ही मुले घरीच होती.

मंगळवारी सायंकाळी सहा वाजता साजिद त्याच्या घरी पोहोचला. मुलांना काहीतरी खायला देण्याच्या बहाण्याने तो त्यांना घेऊन गेला. त्यांना खोलीत कोंडल्यानंतर त्याने एक एक करुन सर्व मुलांचे गळे कापले. मान कापण्यासाठी त्याने वस्ताऱ्याचा वापर केला.

दुसरीकडे, 6 वर्ष आणि 14 वय असलेली मृत मुले आहेत. साजिदने तिसऱ्या मुलाचाही गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कसातरी तेथून सुटून पळून गेला. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लहान मुलांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. लोकांची गर्दी पाहून साजिदने घटनास्थळावरुन पळ काढला. हत्येनंतर साजिद मुलांचे रक्त पीत होता, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रक्त पिणे आदी आरोपांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ फरार आरोपीचा शोध सुरु केला. अखेर साजिदला पोलिसांनी पकडले. पोलीस त्याला सोबत घेऊन जात असतानाच साजिदने पोलिसांवर हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साजिदला समोरासमोर चकमकीत ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शहरातील एका सलूनचीही तोडफोड केली. हे सलून साजिद आणि त्याचा भाऊ जावेद याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

दुसरीकडे, पोलिस मृतदेह घेऊन जात असताना मुलांची आई रस्त्यावर पडली आणि बेशुद्ध झाली. घटनेनंतर काही वेळातच हिंदू संघटनांचे लोक पोलीस चौकीसमोर जमले. यावेळी त्यांनी पोलीस चौकीसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT