Serial Killer Killed in Encounter Dainik Gomantak
देश

Crime News: नोकरी गेली, नशेत गुरफटला, 24 तासात 3 हत्या केल्या! अखेर सैनिकाचा पोलिसांनी केला खात्मा; सीरियल किलरचा थरारक शेवट

Serial Killer Killed in Encounter: कोणत्याही वैयक्तिक वादाशिवाय केवळ 24 तासांत तीन निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका सीरियल किलरला पोलिसांनी चकमकीत ठार केले.

Manish Jadhav

Chandauli Serial Killer Encounter: उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली. कोणत्याही वैयक्तिक वादाशिवाय केवळ 24 तासांत तीन निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका सीरियल किलरला पोलिसांनी चकमकीत ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. एसओजी (SOG), अलीनगर पोलीस, सकलडीहा पोलीस आणि जीआरपी यांच्या संयुक्त कारवाईत या गुन्हेगाराचा खात्मा करण्यात आला. मृत आरोपीची ओळख पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी गुरप्रीत सिंह म्हणून झाली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंह हा 2011 मध्ये भारतीय सैन्यातून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो दारुच्या आहारी गेला होता. बिहारमधील आरा येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी सुटल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या विचलित झाला होता. त्याने पहिली हत्या 10 मे रोजी ताडीघाट पॅसेंजरमध्ये एका प्रवाशाची गोळी झाडून केली. त्यानंतर 11 मे रोजी कोलकाता-जम्मूतवी एक्सप्रेसमध्ये दुसऱ्या प्रवाशाचा जीव घेतला. सोमवारी सकाळी अलीनगर येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) घुसून त्याने तिथे उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या डोक्यात गोळी झाडून तिसरी हत्या केली. रुग्णालयातील या हत्येनंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांनी (Police) जेव्हा त्याला गुन्ह्याचे दृश्य पुन्हा उभे करण्यासाठी नेले, तेव्हा त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाताना त्याने पोलीस पथकावर गोळीबारही केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुरप्रीत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या चकमकीत जीआरपीचा एक मुख्य हवालदार आणि अन्य एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले. आरोपीकडून एक रिव्हॉल्व्हर, काडतूस आणि कपात केलेली डीबीबीएल (DBBL) बंदूक जप्त करण्यात आली असून पोलिसांनी या चकमकीला दुजोरा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT