Allahabad High Court

 

Dainik Gomantak 

देश

'यूपी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात': अलाहाबाद उच्च न्यायालय

यूपीच्या निवडणुका (Uttar Pradesh Assembly elections ) 1 ते 2 महिन्यांनी पुढे ढकलण्यात याव्यात. निवडणूक रॅलींवर तात्काळ बंदी घालण्यात आली.

दैनिक गोमन्तक

देशभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना उत्तर प्रदेश निवडणुका पुढे ढकलण्याची आणि रॅलींवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती केली आहे. वास्तविक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांनी सांगितले की, जीवन असेल तर जग आहे. यूपीच्या निवडणुका 1 ते 2 महिन्यांनी पुढे ढकलण्यात याव्यात. निवडणूक रॅलींवर तात्काळ बंदी घालण्यात आली.

दरम्यान, देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजधानी दिल्लीत आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये दक्षता आणि नव्या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत पीएम मोदी म्हणाले, राज्याने जिल्हा स्तरावर आरोग्य यंत्रणा मजबूत केली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीवर सरकारची नजर आणि लक्ष आहे.

शिवाय, पंतप्रधानांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण चाचणी आणि आरोग्य पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. लसीकरणाचा वेग कमी असलेल्या राज्यांमध्ये केंद्र आपली टीम पाठवेल असा निर्णयही घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT