Ram Mandir 45 kg gold used Dainik Gomantak
देश

Ram Mandir: राम मंदिरासाठी वापरले 50 कोटींचे सोने! दरवाजे, आसनांनाही सुवर्णस्पर्श; निर्माण समितीच्या अध्यक्षांनी दिली माहिती

Ram Mandir Gold Usage: प्रत्यक्ष मंदिराचा काही भाग आणि प्रभू श्रीरामाचे आसन यांच्या निर्मितीसाठी देखील सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

अयोध्या: राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत ४५ किलोग्रॅम एवढ्या शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.

या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारातील मूर्तीसह याच परिसरातील आठ मंदिरांतील मूर्तीची नुकतीच विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

या मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याचे एकूण मूल्य (त्यावरील कर वगळून) हे ५० कोटी रुपये एवढी असल्याचेही ते म्हणाले. प्रत्यक्ष मंदिराचा काही भाग आणि प्रभू श्रीरामाचे आसन यांच्या निर्मितीसाठी देखील सोन्याचा वापर करण्यात आला आहे. शेषावतार मंदिरातील सुवर्ण काम अद्याप सुरू असल्याचे मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आले.

मुख्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरीसुद्धा अन्य मजल्यांचे बांधकाम सुरूच आहे. त्यामध्ये संग्रहालय, ऑडिटोरियम आणि गेस्टहाउसचा समावेश आहे.या वास्तूंचे बांधकाम देखील डिसेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. राम दरबारातील देवतांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर या पवित्र जागेवरील गर्दीच्या नियंत्रणावर यंत्रणेकडून काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुजराती व्यापाऱ्याचे महादान

गुजरातच्या सुरतमधील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी प्रभू श्रीरामाला अनेक मौल्यवान दागिने भेट दिले असून त्यामध्ये अकरा मुकुट, सोन्याचा धनुष्य आणि बाणाचाही समावेश आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पटेल यांनी जे अकरा मुकुट दान केले आहेत त्यासाठी ३० किलोग्रॅम चांदी, तीनशे ग्रॅम सोने आणि माणिक यांचा वापर करण्यात आला आहे. हे सगळे मौल्यवान दागिने आणि भेटवस्तू या विशेष विमानाने गुजरातहून अयोध्येला आणण्यात आल्या होत्या.

मुख्य गर्भगृहाच्या दिशेने जाणारा रस्ता हा खूप लांब आणि दगडी असून उन्हाळ्याच्या काळात हे दगड खूप तापतात. येथे भव्य राममंदिर उभे राहण्यापूर्वी मी अनेकदा येथे आलो आहे त्यावेळी हा रस्ता एवढा लांब नव्हता त्यामुळे फारसा त्रास होत नसे. आता मार्बलचे रस्ते लवकर तापतात आणि त्यामुळे पाय अक्षरशः भाजून निघतात.
रामजी मिश्रा, बस्ती येथील रामभक्त
मंदिर ट्रस्टने आवारामध्ये लाल रंगाच्या सतरंज्या आणि चटाया अंथरल्या असून त्याही अनेक ठिकाणांवर फाटल्याचे दिसते. खरंतर अशा स्थितीमध्ये प्रत्येक भाविकाने जाड पायमोजे घालणे अधिक योग्य ठरेल असे वाटते.
सुधाकर तिवारी, रामभक्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

SCROLL FOR NEXT