Donald Trump Dainik Gomantak
देश

Israel-Hamas War: गाझावर हमासचाच ताबा राहणार? अमेरिकेचा इस्रायलला मोठा झटका

Gaza Strip Control Controversy: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना अमेरिकेने इस्त्रायलला मोठा झटका दिला आहे. तब्बल 19 महिन्यांच्या इस्रायली बॉम्बहल्ल्यांनंतरही गाझामधून हमासला समूळ नष्ट करणे अशक्य झाले आहे.

Manish Jadhav

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना अमेरिकेने इस्त्रायलला मोठा झटका दिला आहे. तब्बल 19 महिन्यांच्या इस्रायली बॉम्बहल्ल्यांनंतरही गाझामधून हमासला समूळ नष्ट करणे अशक्य झाले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी लागू करण्याच्या प्रयत्नांमध्ये ट्रम्प प्रशासनाने हमासच्या नि:शस्त्रीकरणाची मागणी मागे घेतल्याचे वृत्त आहे. जो इस्रायलसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायल सुरुवातीपासूनच अशी मागणी करत आहे की, हमासने आपली शस्त्रे टाकून द्यावीत. गाझा हे अमेरिका किंवा पॅलेस्टिनी प्राधिकरण (पीए) द्वारे नियंत्रित केले जावे. मात्र हमासने ही अट मान्य करण्यास नकार दिला. तर गाझामधून इस्रायल पूर्णपणे माघार घेण्याच्या मागणीवर ठाम राहिला.

अमेरिकेच्या धोरणात बदल!

द न्यू अरबच्या साइट अल-अरेबी अल-जदीदच्या वृत्तानुसार, अमेरिकेकडून (America) वाटाघाटी करणाऱ्यांनी इजिप्शियन मध्यस्थांना सांगितले की, हमासच्या निःशस्त्रीकरणाचा मुद्दा युद्धबंदी कराराची तात्काळ आवश्यकता नसून नंतर सोडवता येईल. या चर्चेची माहिती असलेल्या एका इजिप्शियन सूत्राने अल-अरबी अल-जदीदला सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी पॅलेस्टिनी शस्त्रे, विशेषतः गाझामधील हमासच्या शस्त्रास्त्रांचे समर्पण युद्धबंदी करारापासून वेगळे करण्यास सहमती दर्शवली आहे.

21 इस्रायली कैद्यांची सुटका ही प्राथमिकता

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट होते की, अमेरिकेची प्राथमिकता 21 जिवंत इस्रायली बंधकांना सोडणे आहे. तर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू गाझामधून हमासचे उच्चाटन करण्याचा आग्रह धरत आहेत. गाझामध्ये (Gaza) हमासच्या ताब्यात अजूनही सुमारे 21 जिवंत इस्त्रायली आहेत, ज्यांच्या सुटकेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरु शकते. तसेच, या करारानंतर गेल्या 19 महिन्यांपासून निर्बंध आणि बॉम्बहल्ल्याचा सामना करणाऱ्या गाझाच्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. या युद्धात 50 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींनी आपले प्राण गमावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

Mrunal Thakur Apologizes: बिपाशाला 'पुरुषांसारखी' म्हणणं मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलं महागात; नेटकऱ्यांच्या टीकेनंतर मागितली माफी, म्हणाली- 'मी 19 वर्षांची...'

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! शुभमन, सिराजबाबत प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

SCROLL FOR NEXT