Urvashi Rautela Dainik Gomantak
देश

Urvashi Rautela: 1300 कोटींचं दागिनं, 40 कोटींचा ड्रेस... उर्वशी रौतेलाचा कान्समध्ये जलवा! Video पाहून तुमचे डोळे विस्फारतील

Urvashi Rautela Cannes 2025: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या खास फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिने तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली आहे.

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या खास फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिने तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली आहे. कान्सच्या पहिल्या दिवशी उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. या गाऊनची किंमत जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कान्समध्ये उर्वशीने परिधान केलेला कस्टम-मेड गाऊन प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्को यांनी डिझाइन केला होता. उर्वशीच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला की, त्याची किंमत तब्बल 4.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40 कोटी रुपये आहे.

गाऊनची खासियत काय?

दरम्यान, या गाऊनची खासियत केवळ त्याची किंमतच नाही तर त्याची अद्भुत डिझाइन देखील आहे. उर्वशीचा हा गाऊन मेक्सिकन कलेपासून प्रेरित आहे. त्याच्या निर्मितीमध्ये हजारो तास खर्च करण्यात आले असून त्यात उत्कृष्ट क्रिस्टल्स, मौल्यवान हिरे आणि विविध प्रकारचे कापड वापरण्यात आले आहे. या गाऊनचे डिझािन मेक्सिकन आणि अ‍ॅझ्टेक कला प्रतिबिंबित करते. मायकेल सिन्को हे आधीच टॉप डिझायनर्सपैकी एक मानले जातात आणि त्यांच्या नावाने या गाऊनच्या सौंदर्यात आणखी भर घातली. कान्ससारख्या मोठ्या कार्यक्रमासाठी हा गाऊन एक परिपूर्ण ऑप्शन होता, ज्यामुळे उर्वशी रेड कार्पेटवर वेगळी आणि खास दिसली.

हजारो कोटी किमतीचे दागिने

फक्त गाऊनच नाही तर उर्वशीने कोट्यवधी रुपयांचे दागिने घातले होते जेणेकरुन ती आणखी आकर्षक दिसू शकेल. तिच्या दागिन्यांची एकूण किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशीने 151 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 12 लाख 88 कोटी 98 लाख 21 हजार 48 रुपये (सुमारे 1300 कोटी) किमतीचे दागिने परिधान केले होते. तिच्या दागिन्यांमध्ये मौसाईफ रेड डायमंड, ओपेनहायमर ब्लू डायमंड, ड्रेस्डेन ग्रीन डायमंड आणि टिफनी यलो डायमंड असे अनेक महागडे हिरे वापरले गेले होते.

या दागिन्यांव्यतिरिक्त, उर्वशीने ज्युडिथ लीबरचा स्कारलेट पॅरट शेपचा हिरा क्लच (पर्स) देखील कॅरी केला होता, ज्याची किंमत सुमारे 6 लाख असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, जर उर्वशीच्या जवळच्या सूत्राचा दावा खरा असेल तर उर्वशीच्या या लूकची किंमत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'मन्नत'पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'मन्नत'ची किंमत सुमारे 200 कोटी आहे.

पहिल्या लूकपासूनच ती हिट झाली

काही लोक उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) पहिल्या लूकला शालिनी पासीची कॉपी असेही म्हणत आहेत. पण इतक्या महागड्या आणि सुंदर गाऊन आणि दागिन्यांसह रेड कार्पेटवर आपला जलवा आणि स्टाईल दाखवणारी उर्वशी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT