Urfi Javed Viral Video Dainik Gomantak
देश

Urfi Javed Viral Video: बापरे! इंजेक्शनचा खतरनाक परिणाम; फुग्यासारखे फुगले उर्फी जावेदचे नाजूक ओठ, पाहा व्हिडिओ

Urfi Javed Injection Viral Video: नेहमीच अतरंगी फॅशन आणि धाडसी वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Sameer Amunekar

नेहमीच अतरंगी फॅशन आणि धाडसी वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. रविवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यात ती तिच्या ओठांवरील फिलिंग काढण्यासाठी इंजेक्शन घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या चेहऱ्यावर इंजेक्शन घेताना थेट कॅमेऱ्यासमोर दिसत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तिचा चेहरा सुजलेला आहे.

उर्फीच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटमध्ये काळजी व्यक्त केलीय. तर काहींनी उर्फीच्या या निर्णयावर टीकाही केली आहे. अनेकांनी म्हटले की, "उर्फी तुला फिलिंगची गरजच नव्हती… तू अशीच सुंदर होतीस… आता तुझा लूकच खराब झालाय."

उर्फी जावेदने याआधीही तिच्या हटके फॅशनमुळे आणि धाडसी वक्तव्यांमुळे लक्ष वेधले आहे. तिच्या अतरंगी आणि प्रयोगशील स्टाईलमुळे ती बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

उर्फी जावेदने २०१६ मध्ये ‘बडे भैय्या की दुल्हनिया’ या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘बेपनाह’, ‘पंच बीट’, ‘आये मेरे हमसफर’ आणि ‘दूरियां’ यासारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवत उर्फीने छोट्या पडद्यावर आपले स्थान निर्माण केले.

इतकेच नाही तर उर्फीने विविध रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ मध्ये तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे आणि ठाम मतांमुळे ती प्रेक्षकांच्या चर्चेत राहिली.

उर्फी सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिच्या फॅशन स्टेटमेंट्समुळे ती कायम चर्चेत राहते. मात्र यावेळी तिच्या सौंदर्यात केलेल्या हस्तक्षेपावरुन चाहत्यांमध्ये चिंता आणि चर्चा दोन्ही रंगताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT