Bihar News: बिहारमधील सासाराम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमी मिरवणुकीसंदर्भात गेल्या गुरुवारपासून सासाराममध्ये वातावरण तापले होते. आज शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाल्यानंतर वातावरण अधिकच गंभीर बनले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटात दगडफेकीनंतर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काही दिवसांत येथे भेट देणार असताना हा सर्व प्रकार घडत आहे, ही चिंतेची बाब आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह सम्राट अशोकाच्या जयंती सोहळ्यानिमित्त भाजपच्या (BJP) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याच ठिकाणी जाणार आहेत.
या घटनेनंतर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकरण इतके चिघळले आहे की, रॅपिड अॅक्शन फोर्सलाही घटनास्थळी तैनात करावे लागले आहे.
दुसरीकडे, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, हे सासाराममधील गोंधळाचे आहेत. रामनवमीच्या मिरवणुकीबाबत गेल्या गुरुवारपासून येथे तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी दुपारपर्यंत तणावाचे रुपांतर हाणामारीत झाले. गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत.
तसेच, या घटनेबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता परिस्थिती आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये हातात लाकडी दांडके घेऊन काही लोक गोंधळ घालताना दिसत आहेत. रस्ते दगडांनी भरलेले होते, काही लोकांनी डोके धरले होते, कारण त्यांना दुखापत झाली होती. काही घरांना आग लागल्याचे वृत्तही समोर आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.