Army Chief General Manoj Pande ANI
देश

मोदी सरकारने केला अग्निपथ योजनेत मोठा बदल, वयोमर्यादेत केली वाढ

युवकांना अग्निपथ योजनेची सर्व योग्य माहिती माहित नाही. एकदा तरूणांना योजनेची माहिती मिळाल्यावर विश्वास बसेल.

दैनिक गोमन्तक

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात तरुणांची निदर्शने सुरू आहेत. उत्तर प्रदेशपासून ते दिल्ली, हरियाणा, बिहार, बंगालपर्यंत या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. त्याचवेळी, हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी यांनी एक मोठे विधान जारी केले की भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीरांची भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल.

याआधी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शुक्रवारी सकाळी या आंदोलनादरम्यान सरकारने तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे वक्तव्य केले होते. अग्निपथ योजना तरुणांच्या हिताची असून, लवकरच त्याची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तरुणांना सशस्त्र दलात भरती होण्याची संधी मिळाली नाही, मात्र आता लवकरच भरती सुरू होणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

'या प्रकरणी, मला असे वाटते की युवकांना अग्निपथ योजनेची सर्व योग्य माहिती माहित नाही. एकदा त्यांना या योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांना विश्वास बसेल की ही योजना केवळ तरुणांसाठी नाही तर सर्वांसाठी फायदेशीर आहे,' असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

तरूणांचा वाढता विरोध बघता सरकारने उच्च वयोमर्यादा 21 वर्षावरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन योजनेमुळे आणखी लोकांना नोकऱ्या मिळतील, असे राजनाथ सिंह पुढे म्हणाले.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ देशातील अनेक भागात सलग तिसऱ्या दिवशी भीषण निदर्शने होत आहेत. बिहार आणि यूपीनंतर तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये आंदोलकांनी ट्रेनला आग लावली. या घटनेनंतर चार-पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दुसरीकडे, अलिगडमधील यमुना एक्स्प्रेस वेवर आंदोलकांनी कब्जा केला आहे. एक्स्प्रेस वेवर वाहने अडकली असून पोलीस प्रशासन निदर्शने करणाऱ्या तरूणांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलकांनी यूपी रोडवेजच्या बसेसची तोडफोड केली, बस पेटवून दिली. तर दुसरीकडे बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या योजनेच्या विरोधात अनेक राज्यात आंदोलनं होत आहे.

संतप्त जमावाने बिहार ते उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगणासह 11 राज्यांमध्ये गोंधळ घातला आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये आज सकाळी जम्मूतवी-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेनला आग लावली, ज्यात ट्रेनच्या दोन बोगी जळून खाक झाल्या, तर यूपीच्या बलियामध्ये तरुणांच्या उग्र जमावाने गोंधळ घातला आणि अनेक गाड्यांची तोडफोड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT