''अग्निपथ' योजनासंबंधी युवकांमध्ये जागृती निर्माण व्हावी'

साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील युवकांना मिळणार लाभ
Tour of Duty
Tour of Duty Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या 'अग्निपथ' योजनासंबंधी युवकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी महिनाभर विविध उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. (Awareness should be created among the youth about the Agneepath scheme )

Tour of Duty
चावडी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; संबंधित व्यक्ती मुळची कर्नाटकातील

संरक्षण मंत्रालयातर्फे 'अग्निपथ' या नवीन योजनेची घोषणा मंगळवारी करण्यात आली होती. त्यासंबंधी विक्रम मेनन यांनी माहिती देताना त्यामागील ध्येय, उद्दिष्ट्ये सांगितली. साडेसतरा ते एकवीस या वर्षे वयोगटातील युवकांना या योजनाचा लाभ मिळणार आहे. निवड झालेल्या युवकांना अग्निवीर म्हणून संबोधले जाणार आहेत.

Tour of Duty
गोवेकरांच्या चिंतेत भर; राज्यात कोरोना रूग्णसंख्येचा आकडा 600 पार

या योजनेतील सैन्यभरती ही चार वर्षासाठी असेल. त्यानंतर त्या युवकांना विविध संरक्षण यंत्रणामध्ये सामावून घेतले जाणार आहे. या योजनेअंतर्गत युवकांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशसेवा, समाजासाठी सेवा यातून त्यांना समाधान मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना विविध शस्त्रे, उपकरणे व इतर गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्यांना संबंधित विभागाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आम्ही निरनिराळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देणार आहे. त्यांना राष्ट्र उभारणीला हातभार लावण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे तसेच त्यांना भविष्यात कोणता लाभ होईल, हे सांगितले जातील. त्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांचेही निरासन केले जाईल, असे विक्रम मेनन यांनी सांगितले. बहुतांश महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट असल्याने तेथील विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देण्यात येईल. त्यांना या योजनेतून कोणता लाभ मिळणार, हे सांगितले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com