Congress To Release Manifesto Dainik Gomantak
देश

UP Polls: सपा-भाजपच्या वादात काँग्रेस आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार

आज दुपारी 1 वाजता लखनऊ कार्यालयात यूपी निवडणुकीसाठी प्रियंका गांधी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त एक दिवस उरला आहे. गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे, मात्र त्याआधी लखनौच्या (Lucknow) शर्यतीने आणखी एक मनोरंजक वळण घेतले आहे, आता हा लढा लोकप्रिय घोषणांपासून मुक्त आश्वासनांवरती आला आहे. 8 फेब्रुवारी राजी भाजप (BJP) आणि समाजवादी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये फुकटची आश्वासने दिली, त्यामुळे आज मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेसने गदारोळ करण्याची तयारी केली आहे. (UP Election 2022 latest News updates)

काँग्रेस (Congress) सरचिटणीस आणि पक्षाच्या यूपी प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज दुपारी 1 वाजता लखनऊ कार्यालयात यूपी निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा (Party Manifesto) प्रसिद्ध करणार (Congress To Release Manifesto) आहेत. त्याला प्रगत विधान असे नाव देण्यात आले आहे, यावेळी यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू (Ajay Kumar Lallu) यांच्यासह राज्य संघटनेचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

महिलांसाठी 8 लाख नोकऱ्या देणार

एका वर्षात 3 मोफत सिलिंडर उपलब्ध करुण देणार

स्पर्धा परीक्षा 'शुल्कमुक्त' होणार

परीक्षेसाठी मोफत प्रवास करता येणार

विद्यार्थिनींना स्मार्ट फोन, स्कूटी देणार

मागासलेल्यांना 1% व्याजाने कर्ज उपलब्ध

शेतकरी कर्जमाफी होणार

शेतकऱ्यांना 50 टक्के मोफत वीज मिळणार

गरीब कुटुंबांना 25000 रुपये देण्याचे आश्वासन

20 लाख सरकारी नोकऱ्या मिळणार

काँग्रेसचा भर विशेषत: यूपीच्या महिला मतदारांवर आहे, ज्या नवीन सरकार बनवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळेच यूपीमध्ये 403 जागांवर एकट्याने लढणाऱ्या काँग्रेसने 40 टक्के महिलांना तिकीट देऊन नवं राजकारण सुरू केलं. अशा स्थितीत आज प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात मुलींसाठी मोठमोठ्या घोषणा असतील तसेच अनेक आश्वासने शेतकऱ्यांच्या तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Goa News Live: नानोडा येथे घराला आग; पाच लाखाहून अधिक रुपयांची हानी

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT