Hospital Dainik Gomantak
देश

UP: सरकारी रुग्णालयांची नावे आता हिंदी अन् उर्दूमध्ये लिहिली जाणार, CMO ना सूचना जारी

Uttar Pradesh News: उत्तरप्रदेशातील सरकारी रुग्णालयांची नावे आता हिंदीसह उर्दूमध्ये लिहिली जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Uttar Pradesh Government Hospitals: उत्तरप्रदेशातील सरकारी रुग्णालयांची नावे आता हिंदीसह उर्दूमध्ये लिहिली जाणार आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने या सूचना सर्व जिल्ह्यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण विभागातील सर्व अधिकारी त्यांच्या नावाच्या फलकांवर हिंदी आणि उर्दूमध्ये नावे लिहितील.

दरम्यान, उन्नाव येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद हारुण नावाच्या व्यक्तीने पत्र लिहून तक्रार केली होती की, 'दुसरी अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता असूनही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध विभागांमध्ये त्याचे पालन होत नाही. यासंबंधीची तक्रार वैद्यकीय आणि आरोग्य विभागाकडेही करण्यात आली होती.' त्यानंतर आदेशाचे पालन करण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य केंद्र संचालक डॉ.शैलेश यांनी दिल्या.

या आदेशानंतर, यूपीमधील 167 सरकारी जिल्हा रुग्णालये, 873 सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) आणि 2934 प्राथमिक आरोग्य केंद्रांची नावे हिंदी आणि उर्दूमध्ये लिहिली जातील. यासोबतच विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारीही त्यांच्या नावाच्या फलकांवर हिंदी आणि उर्दूमध्ये नावे लिहितील.

भाषा विभागाने 1989 मध्ये अधिसूचना जारी केली होती

7 ऑक्टोबर 1989 रोजी भाषा विभागाने उर्दूला द्वितीय अधिकृत भाषेचा दर्जा देणारी अधिसूचना जारी केली होती. 19 नोव्हेंबर 1990 रोजी या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला होता. दरम्यान, या आदेशाचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचे काटेकोरपणे पालन होत नव्हते. आता पुन्हा एकदा वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

SCROLL FOR NEXT