Mukul Goyal Director General of Police, UP Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: मुकुल गोयल यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवले

यूपीचे पोलीस महासंचालक मुकुल गोयल यांना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Uttar Pradesh News : लखनौमधून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक मुकुल गोयल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. सरकारी कामाकडे दुर्लक्ष, विभागीय कामात रस नसणे आणि निष्क्रियता यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना पोलीस महासंचालक या महत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. मुकुल गोयल यांच्याकडे नागरी संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुकुल गोयल यांची नागरी संरक्षण विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुकुल गोयल यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन परत आणून राज्याचे पोलीस महासंचालक बनवण्यात आले होते.

मुकुल गोयल हे पश्चिम उत्तर प्रदेशातील शामलीचे रहिवासी

दरम्यान, 30 जुलै 2021 रोजी 1987 बॅचचे IPS अधिकारी मुकुल गोयल यांची उत्तर प्रदेशचे नवीन पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुकुल गोयल हे मूळचे पश्चिम उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आहेत. 1987 च्या बॅचचे मुकुल गोयल हे आयपीएस अधिकारी आहेत. यूपीचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते सीमा सुरक्षा दलात एडीजी म्हणून कार्यरत होते. पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. मुकुल गोयल यांची ओळख यूपी पोलिसांमध्ये (Police) खूप खास मानली जाते.

मुकुल गोयल यांची अभियांत्रिकी पार्श्वभूमी

मुकुल गोयल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1964 रोजी शामलीमध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण शामलीमध्येच झाले. त्यावेळी शामली जिल्हा हा मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्याचा भाग होता. गोयल इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक आहेत. त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात एमबीएही केले आहे. मुकुल गोयल यांना त्यांच्या शौर्य आणि प्रामाणिकपणाबद्दल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून तीनदा सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT