Indian Army Spying Case: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी भारतीय लष्कराची हेरगिरी करणाऱ्या वसीउल्लाहला उत्तर प्रदेश एटीएसने मंगळवारी लखनऊमध्ये अटक केली. राजाजीपुरम येथील मीना बेकरीजवळ राहणाऱ्या वसीउल्लाहला न्यायालयात हजर करुन रिमांडवर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयशी त्याचे कनेक्शन आणि गुप्त माहिती पाठवल्याबद्दल पुष्टी झाल्यानंतर वसीउल्लाहला एटीएस मुख्यालयात बोलावण्यात आले होते, जिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने कबूल केले की, पैशाच्या लोभापोटी तो आयएसआय एजंटच्या कटात सामील झाला होता. तो गुप्त माहिती त्यांना शेअर करायचा.
दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सद्वारे आयएसआयला शेअर केल्याचा आरोप असलेल्या शैलेश कुमार उर्फ शैलेंद्र सिंह चौहानला अटक केली होती. त्याच्याकडून चौकशीदरम्यान वसीउल्लाह मुलगा रहमत उल्ला खान हा C-2533, मीना बेकरी, राजाजीपुरम, लखनऊ येथे राहतो आणि तो सायबर गुन्ह्यांच्या ऑनलाइन ग्रुपचा सदस्य असल्याची माहिती मिळाली. आयएसआय एजंट आणि सायबर हॅकर्सच्या संपर्कात असल्याचेही त्याने सांगितले.
दुसरीकडे, या अवैध धंद्यात गुप्तता राखण्यासाठी वसीउल्लाह हा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून व्यवहारही करायचा. आयएसआय एजंटच्या सूचनेनुसार वसीउल्लाहने भारतीय लष्कराशी संबंधित माहिती शैलेश आणि इतर आयएसआय एजंटना दिली. या मोबदल्यात वसीउल्लाहने त्याच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर केली होती. वसीउल्लाहने कबूल केले की, आयएसआय एजंटच्या सूचनेनुसार त्याने आपल्या बँक खात्याचा गैरवापर केला आणि शैलेश आणि इतर आयएसआय एजंटना हेरगिरीसाठी पैसे पाठवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.