Manish Tiwari Dainik Gomantak
देश

'जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी पाठवणे थांबवत नाही तोपर्यंत...': मनीष तिवारी

जोपर्यंत पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी पाठवणे आणि ड्रोनद्वारे ड्रग्स आणि शस्त्रे पाठवणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर व्यापाराशी संबंधित कोणतीही चर्चा व्यर्थ आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पाकिस्तानसोबत व्यापार सुरु करण्याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी रविवारी पलटवार केला आहे. शेजारी देश जोपर्यंत भारतविरोधी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी (Pakistan) व्यापार-संबंधित कोणतीही चर्चा “निरुपयोगी आणि व्यर्थ” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तिवारी म्हणाले की, जोपर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवणे आणि ड्रोनद्वारे ड्रग्स आणि शस्त्रे पाठवणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर व्यापाराशी संबंधित कोणतीही चर्चा व्यर्थ आहे.

अमृतसरमध्ये मीडियाशी बोलताना सिद्धू म्हणाले होते की, जर पाकिस्तानशी आमची मैत्री वाढली तरच दोन्ही देशातील व्यापारी संबंध वृध्दिगंत होतील. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या योजनेचे मी कौतुक करतो, जेव्हा त्यांनी भारत ते पाकिस्तान बससेवा सुरु केली.

दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत भाजपच्या (BJP) संभाव्य युतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिवारी म्हणाले की, कॅप्टन हे 20 वर्षांपासून काँग्रेसचे नेते होते आणि साडे नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री पदावर राहिले. राज्यात युतीचा परिणाम होणार हे नक्की. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आपला नवा पक्ष स्थापन केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT