Unknown Facts About Harish Salve. Dainik Gomantak
देश

Harish Salve: 68 व्या वर्षी तिसरे लग्न करणाऱ्या हरीश साळवेंबद्दल 5 खास गोष्टी

Unknown Facts About Harish Salve: हरीश साळवे यांचे वडिला एनकेपी साळवे यांचा इग्लंडबाहेर पहिला क्रिकेट वर्ल्डकप आयोजित करण्यात सिंहाचा वाटा आहे.

Ashutosh Masgaunde

Unknown Facts About India's Highest Paid Lawyer Harish Salve:

देशातील प्रसिद्ध वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी नुकताच तिसऱ्यांदा विवाह केला. साळवे रविवारी लंडनमध्ये त्रिना नावाच्या महिलेशी तिसरे लग्न केले.

हरीश साळवे यांच्या हायप्रोफाईल लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह अनेक जवळचे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नुकतेच साळवे यांची केंद्र सरकारने वन नेशन-वन इलेक्शन समितीचे सदस्य म्हणून निवड केली आहे.

जन्म आणि बालपण

हरीश साळवे यांचा जन्म 1956 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब वकीली व्यवसायात होते. त्यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्यांची सीए फर्म देखील होती.

साळवे यांनी नागपूर शहरातूनच कॉमर्स ग्रॅज्युएशन केले, त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) चा अभ्यास सुरू केला आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर ते टॅक्सेशन स्पेशालिस्ट झाले.

1980 मध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन वकिलीच्या कारकीर्दीला सुरुवात केली. ते सध्या फक्त भारतातीलच नाही तर जगातील हागड्या वकिलांपैकी एक आहेत.

कुलभूषण जाधव खटल्यात 1 रुपये फी

कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुमारे दोन वर्षांच्या लढ्यानंतर या प्रकरणाची अखेरची सुनावणी घेतली होती. जाधव यांची केस हरीश साळवे यांनी लढवली. त्यासाठी साळवे यांनी भारत सरकारकडून केवळ एक रुपया फी घेतली.

इंग्लंडच्या क्वीन्स कौन्सिलमध्ये स्थान

हरीश साळवे 2002 पर्यंत वरिष्ठ वकील झाले. त्यानंतर त्यांनी 2004 पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. पुढे साळवे यांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर वकिली सुरू केली.

यानंतर ते लंडनमधील न्यायालयांत नियमितपणे खटले लढवू लागले. 2013 मध्ये त्यांची इंग्लंड बार काउंन्सीलमध्ये नियुक्ती झाली. या वर्षी जानेवारीमध्ये त्यांची इंग्लंडच्या राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हिट अँड रन प्रकरणात सलमानची बाजू

2015 साली हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला न्यायालयातून थेट आर्थर रोड कारागृहात नेण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, एक कायदेशीर डाव खेळत हरीश साळवे यांनी सलमानची बाजू न्यायालयात मांडली आणि त्याला जामीन मिळवून दिला.

आदेशाची प्रत मिळाली नसल्याने सलमानला तुरुंगात पाठवणे योग्य नाही, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी न्यायालयात केला होता. त्याचा युक्तिवाद योग्य मानून न्यायालयाने सलमान खानला दोन दिवसांचा जामीन मंजूर केला होता.

साळवे यांच्या वडिलांच्या नावावरुन एनकेपी साळवे ट्रॉफी

हरीश साळवे यांचे वडील एनकेपी साळवे हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होते, परंतु ते त्यांच्या क्रिकेट प्रशासक आणि काँग्रेसमधील राजकीय इनिग्जसाठी जास्ता ओळखले जातात.

प्रथमच इंग्लंडच्या बाहेर क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. बीसीसीआयने 1995 मध्ये त्यांच्या नावावर एनकेपी साळवे ट्रॉफी सुरू केली.

इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT