exam postponded  
देश

लोकसेवा आयोगाने 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व ) परीक्षा, 2020 पुढे ढकलली

Dainik Gomantak

नवी दिल्‍ली,
कोविड-19 मुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने आज विशेष बैठक घेतली. निर्बंधांच्या मुदतवाढीची दखल घेत आयोगाने निर्णय घेतला की सध्या परीक्षा आणि मुलाखत पुन्हा घेणे शक्य नाही.

त्यामुळे 31 मे 2020 रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व ) परीक्षा 2020 स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय वन सेवा परीक्षेची पात्रता परीक्षा देखील असल्यामुळे भारतीय वन सेवा परीक्षेचे वेळापत्रकदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. 20 मे  2020 रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि या परीक्षांच्या नव्या तारखा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या संकेतस्थळावर आगामी काळात अधिसूचित केल्या जातील. 

आयोगाने यापूर्वीच पुढील बाबींना  स्थगिती दिली आहे: (अ) नागरी सेवा परीक्षा 2019 साठी उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी ; (ब) भारतीय वित्तीय  सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 साठी अधिसूचना; (क) संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा  2020 साठी अधिसूचना (ड) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा, 2020 साठी अधिसूचना आणि (ई) एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा 2020 

स्थगित चाचण्या / परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्यावर उमेदवारांना  किमान 30 दिवसांची नोटीस दिली जाईल याची खात्री केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

SCROLL FOR NEXT