Race for CM of Rajasthan
Race for CM of Rajasthan  Dainik Gomantak
देश

CM of Rajasthan: राजस्थानच्या राजकारणात ट्विस्ट! केंद्रीय मंत्र्याला मिळू शकते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

Ashutosh Masgaunde

Union Minister Ashwin Vaishnav is leading the race for the Chief Minister of Rajasthan:

राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शर्यत तीव्र झाली आहे. दरम्यान, मोठी बातमी अशी आहे की, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

अश्विनी वैष्णव या दोन मोठ्या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. राजस्थानमध्ये भाजप ओबीसींना मुख्यमंत्री बनवू शकते आणि हा चेहरा अश्विनी वैष्णव असू शकतात, असे मानले जात आहे.

आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठकही दिल्लीत पार पडली ज्यामध्ये पक्षाकडून पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही, मात्र पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता या शर्यतीत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांचे नाव समोर येत आहे. केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून, अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याने सर्वोच्च नेतृत्व प्रभावित केले आहे.

वसुंधरा यांनी घेतली 60 आमदारांची भेट

यापूर्वी, सुमारे 60 नवनिर्वाचित आमदारांनी सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी भेट घेतली होती.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचे नाव संसदीय मंडळ ठरवणार असून, त्याआधी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे. मात्र, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत पक्षाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. रविवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला ११५ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आहेत.

राज्यात 200 पैकी 199 जागांवर निवडणूक झाली आहे. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता येथे ५ जानेवारीला निवडणूक होणार असून ८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या दावेदारांमध्ये जयपूरच्या राजघराण्यातील राजकुमारी दिया कुमारी आणि योगी बालकनाथ यांचाही समावेश आहे. हे दोघेही लोकसभा सदस्य असून त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Bus Service In Panjim: सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

Shri Damodar Temple Zambaulim: ५६.६८ किलो सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर

Goa Police: गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Allahabad High Court: एक दिवस भारतातील बहुसंख्य लोक अल्पसंख्याक होतील...धर्मांतरावर अलाहाबाद उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

SCROLL FOR NEXT