केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग Dainik Gomantak
देश

"लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर दहशतवादाच्या घटना कमी झाल्या"

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता लडाख येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन निर्मित 63 पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केले.

दैनिक गोमन्तक

राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या तीन दिवसांच्या लडाख (Ladakh) दौऱ्यावर आहेत.दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) बांधलेल्या 63 पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी लडाखला केंद्र शासित प्रदेश बनवल्यानंतर दहशतवादाच्या घटना कमी झाल्याचे म्हटले आहे.(Union Home Minister Rajnath Singh said that the incidence of terrorism has come down after Ladakh was made a Union Territory)

“लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यामागील दहशतवाद, सामाजिक-आर्थिक विकासाचा अभाव ही काही मुख्य कारणे होती. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. येथे गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्राकडून अनेक पावले उचलली जात आहेत” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार “संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता लडाख येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन निर्मित 63 पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर ते लेह येथे दुपारी 2:30 ते 4 दरम्यान स्थानिक प्रशासनाने आयोजित कार्यक्रमात हजेरी लावतील. नंतर संरक्षणमंत्री सायंकाळी 7 वाजता लेह येथे लष्कराच्या जवानांशी संवाद साधला.

रविवारी लेहमध्ये संरक्षणमंत्र्यांनी लेह, कारगिल आणि लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडक प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे देखील उपस्थित होते. सिंग यांनी सैन्य दलातील माजी सैनिकांना भेटून त्यांचे कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात चर्चा केली. त्यांनी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर के माथुर यांच्याशीही चर्चा केली.

वास्तव परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलाचे मनोबल वाढविण्यासाठी संरक्षणमंत्री उच्च उंचावरील तळ आणि अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत. भारत आणि चीन यांच्यात दोन दिवसांपूर्वी चर्चेची नवीन फेरी पार पडली. त्यानंतर संवेदनशील भागात त्यांचा हा दौरा दीर्घ काळापासून सुरू असलेल्या लष्करी भूमिकेचे निराकरण करण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार असल्याचे सांगितले जाते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT