FM Nirmala Sitaraman Dainik Gomantak
देश

FM Nirmala Sitaraman on Barack Obama: 'तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्ब टाकले...', सीतारामन यांचा ओबामांवर हल्लाबोल

Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निशाणा साधला आहे.

Manish Jadhav

FM Nirmala Sitaraman on Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निशाणा साधला आहे. सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत मुस्लिमांसोबतच्या वागणुकीच्या मुद्द्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा बचाव केला.

यादरम्यान सीतारामन यांनी काँग्रेसवर 'डेटाशिवाय आणि निरुपयोगी मुद्दे' उपस्थित केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष निवडणुकीतील पराभवानंतर असेच करतात.

दरम्यान, अमेरिकेचे माजी पंतप्रधान बराक ओबामा यांच्या भारतातील मुस्लिमांना वागणूक देण्याच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सीतारामन म्हणाल्या की, बराक यांच्या कार्यकाळात 6 मुस्लिमबहुल देशांवर बॉम्ब फेकण्यात आले.

मात्र, 'सबका साथ-सबका विकास'वर मोदी सरकार विश्वास ठेवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत (America) आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.' त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही कोणत्याही समुदयाबरोबर भेदभाव करत नाही.

सीतारामन म्हणाल्या की, 'लोक सहसा असे मुद्दे उपस्थित करतात जे खरोखरच समस्या नसतात. पीएम मोदींना आतापर्यंत एकूण 13 देशांमधून सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत, त्यापैकी 6 मुस्लिम बहुल देशांनी दिले आहेत.'

सीतारामन पुढे म्हणाल्या की, 'कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्य पातळीवर काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यासाठी अनेक जबाबदार लोक काम करत आहेत. मात्र, इतर लोक डेटाशिवाय आरोप करत आहेत, यावरुन भाजपविरोधातील (BJP) ही संघटित मोहीम असल्याचे दिसून येते.'

सीतारामन पुढे असेही म्हणाल्या की, 'मला वाटते की इतर पक्ष निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान मोदींशी स्पर्धा करु शकत नाहीत, म्हणूनच ते अशाप्रकारचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस गेल्या काही निवडणुकांपासून अशा गोष्टी पसरवत आहे.'

दुसरीकडे, सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ओबामांनी पीएम मोदींसोबतच्या चर्चेदरम्यान भारतीय मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले होते, त्यावरुन सीतारामन यांनी ओबामा यांच्यावर निशाणा साधला.

सीतारमन म्हणाल्या की, मला आश्चर्य वाटले की, जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेत भारताबद्दल बोलत होते, तेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर वक्तव्य करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT