Unacademy Sacked A Teacher Karan Sangwan Who Talked About Voting For An Educated Candidate. Dainik Gomantak
देश

"सुशिक्षित उमेदवाराला मत द्या"... Unacademy ने शिक्षकाला बडतर्फ केल्याने का होतोय वाद?

Unacademy ने करण सांगवान नावाच्या एका शिक्षकाला बडतर्फ केले आहे. या शिक्षकाचा गुन्हा काय आहे तर, त्याने विद्यार्थ्यांना "सुशिक्षित उमेदवाराला मत द्या" असे आवाहन केले होते.

Ashutosh Masgaunde

Unacademy Sacked A Teacher Karan Sangwan Who Talked About Voting For An Educated Candidate:

"सुशिक्षित उमेदवारांनाच मतदान करा", असे विद्यार्थ्याना आवाहन करणाऱ्या शिक्षकला एडटेक फर्म अनॅकॅडमीने केले आहे. असे या शिक्षकाचे नाव आहे.

करण सांगवान नावाच्या या शिक्षकाने लेक्चर सुरू असताना विद्यार्थ्यांना केवळ सुशिक्षित उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली असून, त्यानंतर अनॅकॅडमीला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनॅकॅडमीला मोठ्या रोषाला समोरे जावे लागत असून, कंपनीने हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला असल्याचा आरोप अनेकजन करत आहेत.

करण सांगवान नावाच्या शिक्षकाने नोकरीवरून काढून टाकल्यानंतर त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. या वादाची संपूर्ण माहिती १९ ऑगस्टला देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

सांगवान म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामुळे मी वादात सापडलो आहे.

या वादामुळे न्यायिक सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यांच्याबरोबरच मलाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

कंपनीचे निवेदन

रोमन सैनी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अकादमीमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये प्रत्येकाने निष्पक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्ग ही अशी जागा नाही जिथे तुम्ही तुमचे वैयक्तिक मत मांडता आणि विद्यार्थ्यांच्या विचारांवर प्रभाव टाकता. यामुळेच करण सांगवान यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर शिक्षकाला पाठिंबा

ट्विटरवर राहुल तहिलीयानी या यूजरने लिहले आहे की, "Unacademy कडून काढून टाकलेल्या शिक्षक करण सांगवानच्या धैर्याला मी सलाम करतो. हा व्हिडिओ पहा…"

काहींनी माझी वेळ पाहून मला नाकारले, मी शपथ घेतो की मी त्यांच्यावर अशी वेळ आणीन की मला भेटण्यासाठी त्यांना माझी वेळ घ्यावी लागेल.

केजरीवाल संतापले

यावर संपूर्ण प्रकरणावर आश्चर्य व्यक्त करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, सुशिक्षितांना मतदान करण्याचे आवाहन करणे गुन्हा आहे का?

जर कोणी निरक्षर असेल तर वैयक्तिकरित्या मी त्याचा आदर करतो. पण लोकप्रतिनिधी निरक्षर असू शकत नाहीत. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. निरक्षर लोकप्रतिनिधी २१व्या शतकातील आधुनिक भारत कधीच घडवू शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT