By Hacking IRCTC Website, Person Sold Tickets Worth 30 Lakhs In Two Years
By Hacking IRCTC Website, Person Sold Tickets Worth 30 Lakhs In Two YearsDainik Gomantak

IRCTC Website Hacked: रेल्वेची वेबसाइट हॅक करून विकली 30 लाखांची तिकिटे, अशी पकडली चोरी...

IRCTC Hacked: आरोपी सामान्य प्रवाशांपेक्षा वेगाने तिकीट बुक करू शकायचा. त्यानंतर तो ही तिकिटे प्रत्यक्ष बुकिंग किमतीच्या चौपट दराने विकायचा

By Hacking IRCTC Website, Person Sold Tickets Worth 30 Lakhs In Two Years: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना दिल्लीत समोर आली आहे.

आरोपींनी केवळ वेबसाइटच हॅक केली नाही तर 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली आहेत. IRCTC वेबसाईट हॅक करणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.

दोन वर्षांपासून रेल्वेला चुना

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. IRCTC वेबसाइट हॅक केल्याचा आरोप असलेला मोईनुद्दीन चिश्ती हा उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे.

तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान चालवतो. चिश्ती हा दोन वर्षांपासून हा घोटाळा करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सॉफ्टवेअरचा वापर

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की त्याने आयआरसीटीसी पोर्टलवर निनावी वैयक्तिक प्रोफाइल तयार करण्यासाठी Nexus, Sikka V2 आणि Big Boss सारख्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केला होता.

हे अ‍ॅप्स नाव, प्रवास तपशील, ट्रेन निवड यासारखी माहिती आपोआप भरण्यासाठी आणि तिकीट बुकिंगसाठी पेमेंट करण्यासाठी स्क्रिप्टचा वापर करतात.

आरोपीने IRCTC मधील तत्काळ आणि VIP कोट्यातील तिकिटे मिळवण्यासाठी याचा वापर केला. या अ‍ॅप्सच्या मदतीने, मोईनुद्दीन इतर सामान्य प्रवाशांपेक्षा वेगाने तिकीट बुक करू शकायचा. त्यानंतर तो ही तिकिटे प्रत्यक्ष बुकिंग किमतीच्या चौपट दराने विकायचा.

By Hacking IRCTC Website, Person Sold Tickets Worth 30 Lakhs In Two Years
बँकांच्या मनमानीला चाप; RBI कडून कर्ज खात्यावरील दंडाच्या नियमांत बदल

आयपी अ‍ॅड्रेसवरून पोलिसांनी काढला माग

IRCTC एजंटना तिकीट बुक करण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरण्यास मनाई आहे.

IRCTC ने जारी केलेले अधिकृत एजंट खाते वापरून IRCTC पोर्टलच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस करून आम्ही अयोध्या गंज, दादरी, गौतम बुद्ध नगर येथे पोहोचलो, जिथे चिश्तीला सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.

पोलिसांनी असेही सांगितले की चौकशीदरम्यान, संशयिताकडे 88 ई-तिकीटे (E Ticket) आढळून आली ज्याची किंमत 1.55 लाख रुपये आहे.

By Hacking IRCTC Website, Person Sold Tickets Worth 30 Lakhs In Two Years
Rat In Chicken Curry: ऑर्डर चिकन करीची अन् ताटात मेलेला उंदीर! मुंबईतील हॉटेलमधील किळसवाना प्रकार

दोन वर्षांत 30 लाखांच्या तिकिटांची विक्री

या अवैध मार्गाचा वापर करून आरोपींनी गेल्या दोन वर्षांत 30 लाख रुपयांची तिकिटे विकली होती. या आरोपीकडे गणितामध्‍ये बीएससी पदवी देखील आहे.

आरोपी त्याच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे स्थानिक सायबर क्राईम युनिटच्या निदर्शनास आला होता. यानंतर सायबर सेलने रेल्वे पोलीस दलाला सतर्क केले, त्यानंतर मोईनुद्दीन चिश्तीवर कारवाई सुरू करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com