Remote Dainik Gomantak
देश

''मोदी सरकार सक्त'', युक्रेन युद्ध, हिंसाचार अन् लाऊडस्पीकर वादावर एडवाइजरी जारी

रशिया-युक्रेन कव्हरेज, जहांगीरपुरी वाद आणि लाऊडस्पीकरवरील डिबेट शो यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन कव्हरेज, जहांगीरपुरी वाद आणि लाऊडस्पीकरवरील डिबेट शो यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच वृत्तवाहिन्यांना अ‍ॅडव्हायझरी जारी करुन प्रक्षोभक, समाजविघातक, असंसदीय आणि प्रक्षोभक भाषा टाळण्यास सांगितले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (Regulation Act) 1995 च्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे केंद्राने म्हटले आहे. (Ukraine war violence and loudspeaker dispute the Ministry of Information and Broadcasting has issued an advisory)

दरम्यान, जहांगीरपुरी (Jahangirpuri) घटना आणि त्यादरम्यान झालेल्या विविध वादविवाद कार्यक्रमांवर आक्षेप घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्ससाठी एडवाइजरी जारी केली आहे. दरम्यान, विविध मुद्द्यांवर टीव्ही चॅनेल्समध्ये सामाजिक वातावरणात दूषित करणे, दिशाभूल करणारी, सनसनाटी आणि अस्वीकारार्ह भाषा वापरली जात असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.

तसेच, युक्रेन-रशियाबद्दलचे (Russia) खोटे दावे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय एजन्सींची प्रतिमाही मलिन झाली आहे. पत्रकार आणि वृत्त अँकर यांनी प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी मनपसंत, उपहासात्मक गोष्टी सादर केल्या आहेत. जहांगीरपुरी प्रकरणासंदर्भात जातीय हिंसा भडकावणारी प्रक्षोभक माहिती आणि व्हिडिओ न्यूज चॅनल्सकडून दाखवण्यात आले आहेत. यासोबतच पडताळणी न केलेले सीटीव्ही फुटेजही दाखविण्यात आले आहेत.

याशिवाय, विशिष्ट धर्माचे व्हिडिओ दाखवून धार्मिक तेढ वाढवण्यासाठी हवा देण्यात आली. खोडसाळ आणि खळबळजनक मथळे आणि प्राधिकरणाच्या कारवाईला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला आहे. बातम्यांच्या चर्चेदरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी असंसदीय, चिथावणीखोर भाषा वापरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT