Ukraine-Russia War Dainik Gomantak
देश

Ukraine-Russia War: पीएम मोदी अ‍ॅक्शन मोड मध्ये पुतीनशी फोनवरुन चर्चा

पीएम मोदी आणि पुतिन यांच्यातील या संभाषणात युद्ध सुरू झाल्यानंतरच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत युक्रेन-रशिया युद्धामुळे उद्भवलेल्या संकटापासून अस्पर्श राहू शकत नाही, आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. एक मोठा पुढाकार घेत त्यांनी स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवरती संवाद साधून त्यांना शांततेच्या दिशेने पावले टाकण्यास सांगितली आहेत. पीएम मोदी आणि पुतिन यांच्यात सुमारे 20 मिनिटांपर्यंत चर्चा झाली आहे. (Ukraine-Russia War PM Modi discusses phone with Putin in action mode)

पीएम मोदी आणि पुतिन यांच्यातील या संभाषणात युद्ध सुरू झाल्यानंतरच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या संभाषणात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित ताज्या घडामोडींची संपूर्ण माहिती दिली आहे. तर पंतप्रधान मोदी म्हणाले की, रशिया आणि नाटो गटातील वाद प्रामाणिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो आणि हिंसाचार तात्काळ संपवण्याचे आवाहन देखील केले तसेच सर्व पक्षांना राजनैतिक पातळीवरील चर्चेच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी केलेल्या संभाषणाचा आधार देखील युक्रेनने दिल्लीत केलेले भावनिक आवाहनचं होते, ज्यामध्ये युक्रेनच्या राजदूताने भारत आणि रशिया यांच्यातील चांगल्या संबंधांची आठवण करून देत पंतप्रधान मोदींशी चर्चा करून तणाव संपवण्याचे आवाहन देखील केले होते. काही तासांनंतर, पंतप्रधान मोदींनी CCS (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) ची बैठक घेतली, ज्यामध्ये अध्यक्ष पुतिन यांच्याशी मोदींनी दूरध्वनीवरून संभाषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पीएम मोदींनी पुतीन यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आणि त्याचवेळी युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या, विशेषत: तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताच्या देखील चिंता व्यक्त केल्या आहेत. यानंतर पुतिन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आदेश जारी करण्याचे आश्वासनही आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन्ही नेत्यांमधील या संभाषणाचा तपशीलही रशियाकडून देण्यात आला.

रशियाच्या राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरती चर्चा केली. युक्रेनवर हल्ला का करावा लागला हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट पणे सांगितले आहे. पुतिन यांनी पीएम मोदींना सांगितले की कीव सरकारने डॉनबासच्या सामान्य नागरिकांवर आक्रमक कारवाई केली आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अमेरिका (America) आणि नाटोच्या मदतीने सुरू असलेल्या धोरणात्मक हालचालींव्यतिरिक्त मिन्स्क कराराचेही उल्लंघन झाले आणि या सर्व प्रकारामुळे रशियाला लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT