Udit Raj on President Murmu Dainik Gomantak
देश

Udit Raj on President Murmu: राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल केलेलं विधान काँग्रेस नेत्याला भोवलं

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेस नेते उदित राज अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असतात.उदित राज यांनी देशातील पहिल्या दलित महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारखा राष्ट्रपती मिळू नये. चमचगिरीलाही मर्यादा आहेत. असे म्हणतात की 70% लोक गुजरातचे मीठ खातात. स्वतः मीठ खाऊन जीवन जगले तर कळेल.'

भाजपचा हल्लाबोल

भाजपचे (BJP) प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस नेते उदित राज यांच्या राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हणाले, "देशाच्या सर्वोच्च पदाचा आणि आदिवासी समाजाचा वारंवार अपमान करणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे, काँग्रेस नेहमीच आदिवासी समाजाच्या विरोधात राहिली आहे." काँग्रेस आदिवासी समाजाच्या या अपमानाचे समर्थन करते का', वाद वाढत असताना उदित राज (Udit Raj) यांनी स्पष्ट केले, 'माझे विधान द्रौपदी मुर्मूजींचे वैयक्तिक आहे, काँग्रेस पक्षाचे नाही. मुर्मूजींना उमेदवार बनवून आदिवासींच्या नावाने मते मागितली. राष्ट्रपती झाल्यावर आदिवासी राहिले नाहीत का? देशाचा राष्ट्रपती असेल तर आदिवासींचा प्रतिनिधीही असतो. एससी/एसटीच्या नावाने लोक पदरात गेल्यावर रडतात मग गप्प बसतात.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध

उदित राज यांनी पहिल्यादाच वादग्रस्तनिधान केलेले नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच विधाने केली आहेत. राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा करताना उदित राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'जात पाहून आनंदी होऊ नका. कोविंद जी राष्ट्रपती झाले तेव्हा दलित खूश होते आणि शिपायाचे भले करू शकत नव्हते. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस मुख्यालयात आयोजित किसान महापंचायतीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते. न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करून अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT