Accused Dainik Gomantak
देश

Udaipur Murder Case: कन्हैया लाल हत्येतील आरोपींची NIA कोठडी रवानगी

उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाबाहेर लोकांनी बेदम मारहाण केली.

दैनिक गोमन्तक

Udaipur Murder: उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाबाहेर लोकांनी बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयात हजर केल्यानंतर ही घटना घडली. न्यायालयातून बाहेर येत असताना जमावाने आरोपींना बेदम मारहाण केली. यावेळी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड गर्दीतून चारही आरोपींना पोलिस व्हॅनमधून तुरुंगात पाठवण्यात आले. यापूर्वी एनआयए न्यायालयाने या हत्याकांडातील आरोपींना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. उदयपूर हत्याकांडातील आरोपी रियाझ, मो. गौस, मोहसीन आणि आरिफ यांना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. (Udaipur Murder Case NIA Court Sent Four Accused In To NIA Custody Till 12 July)

दरम्यान, एनआयएने उदयपूर (Udaipur) हत्याकांडातील आरोपींना शनिवारीच ताब्यात घेतले होते. या घटनेतील दोन्ही मुख्य आरोपींना अजमेरच्या तुरुंगातून जयपूरला (Jaipur) आणून एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले.

नुपूर शर्माच्या कथित समर्थनासाठी हत्या

उदयपूर येथील टेलर कन्हैया लाल यांची भरदिवसा दोन जणांनी चाकूने वार करुन हत्या केली. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कथितपणे पोस्ट केल्याप्रकरणी दोघांनी ही हत्या केली. या घटनेनंतरच दोन्ही आरोपींना पोलिसांनी (Police) पकडले. विशेष म्हणजे, या घटनेनंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे, राजस्थान सरकारने एका महिन्यासाठी कलम 144 लागू केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT