Kanhai Lal Dainik Gomantak
देश

Udaipur Murder Case: आठव्या आरोपीला चार दिवसांची कोठडी, चौकशीत होणार खुलासे

Udaipur: कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठव्या आरोपीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

Udaipur Murder Case: कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठव्या आरोपीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपीला शनिवारी विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीची कसून चौकशी केली जात असून त्यात आणखी रहस्ये बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 19 वर्षीय मुहम्मद जावेदने कन्हैयालालच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे अटकेनंतर एका निवेदनात तपास यंत्रणेने म्हटले आहे. न्यायालयाने आरोपीला 27 जुलैपर्यंत कोठडी सुनावली.

दुसरीकडे, अख्तारी, गौस, मोहसीन, आसिफ, मोहम्मद मोहसीन, वसीम अली आणि फरहाद मोहम्मद शेख यांच्यासह सात आरोपींना (Accused) कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष सरकारी वकील टीपी शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने अख्तारी, घौस आणि शेख यांची एनआयए (NIA) कोठडीत आणि इतर चौघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.

तसेच, मुख्य आरोपी अख्तारी आणि गौस यांच्याशिवाय इतरांना कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर UAPA अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना 12 जुलैपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT