Udaipur Tailor Murder Case
Udaipur Tailor Murder Case Dainik Gomantak
देश

Udaipur Murder Case: कन्हैयालाल हत्येच्या आरोपपत्रात मोठा खुलासा, हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी पाहिली होती 'ही' वेबसिरीज

Manish Jadhav

Udaipur Murder Case: कन्हैयालाल हत्येप्रकरणी एनआयएने 3500 हजार पानांची चार्जशीट तयार केली आहे. कन्हैयालालच्या हत्येसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याचे आरोपपत्रात उघड झाले आहे.

या गटात सर्वाधिक पाकिस्तानी सक्रिय होते. कन्हैयालालच्या हत्येसाठी पाकिस्तानच्या TLP नेत्याने गौस आणि रियाझ यांना प्यादे बनवले होते. त्याचवेळी उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडात पीएफआयची भूमिकाही समोर आली आहे.

हत्येसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला

कन्हैयालाल हत्येप्रकरणी एनआयएने तयार केलेल्या 3,500 पानांच्या चार्जशीटमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येचा प्लॅन पाकिस्तानात (Pakistan) तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कन्हैयाला मारण्यापूर्वी सर्व मारेकऱ्यांनी इर्तुजुल गाझीची वेब सिरीज पाहिली होती.

विशेष म्हणजे, कन्हैयाला मारण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या गटात सर्वाधिक सक्रिय आणि चिथावणीखोर काम पाकिस्तानी करत असत.

हत्येसाठी रियाझ आणि गौस यांनी एक टीम तयार केली

पाकिस्तानातील टीएलपी नेत्याने आरोपी गौस आणि रियाज यांना प्यादे बनवले होते, असे समोर आले आहे. एनआयएच्या (NIA) आरोपपत्रात रियाझ आणि गौस यांनी कन्हैयालालला मारण्यासाठी कसे एकत्र केले होते हे एकामागून एक उघड झाले.

तसेच, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएने पाकिस्तानी नागरिकांसह 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशभरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्या आणि त्याचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. सुरुवातीला हा गुन्हा राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील धनमंडी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता, नंतर एनआयएने त्याची पुन्हा नोंद केली होती.

दुकानात धारदार शस्त्राने कन्हैयालालची हत्या

विशेष म्हणजे, कन्हैयालाल (48) याची 28 जून 2022 रोजी दुकानात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी दावा केला की, कन्हैयालालने इस्लामचा अपमान केल्याचा बदला म्हणून त्याची हत्या केली. भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली जयपूरमधील विशेष एनआयए न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT