BJP IT Cell Share Video: देशभरात मणिपूरमधील हिंसाचाराने हाहाकार माजवला असतानाच, या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका जमावाने दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांच्यावर हल्ला केला.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शनिवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या बुधवारच्या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये महिलांना निर्दयीपणे मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, राज्याच्या महिला आणि बाल आरोग्य मंत्री शशी पांजा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महिला आपापसात भांडत होत्या आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्या पुढे म्हणाल्या की, नंतर महिला स्वतःहून निघून गेल्या.
पोलिसांनी (Police) सांगितले की, त्या दिवशी काही महिला मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील बाजारात माल विकण्यासाठी गेल्या होत्या, मात्र तिथे लोकांना त्यांनी चोरी केल्याचा संशय आला. मालवीय यांनी ट्विट केले की, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरुच आहे.
मालदा येथील बामनगोला पोलीस ठाण्याच्या पाकुआ हाट परिसरात दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करुन, अत्याचार आणि निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.
त्यावेळी पोलीस मूक प्रेक्षक राहिले. 19 जुलै रोजी सकाळी ही भयानक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. पीडित महिला सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
राज्याच्या महिला आणि बाल आरोग्य मंत्री शशी पांजा यांनी सांगितले की, या घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप विनाकारण याला राजकीय मुद्दा बनवत आहे.
दुसरीकडे, भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी सांगितले होते की, 'पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुक लढवण्याचे धाडस केल्याबद्दल हावडा जिल्ह्यातील पाचला येथे भाजपच्या एका महिला उमेदवाराची नग्न परे़ड काढण्यात आली.'
ते पुढे म्हणाले की, 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महिला असूनही गप्प आहेत.' पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांनी शुक्रवारी सांगितले की, अशा कृत्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.