Manipur Violence: मणिपूरमध्ये इंटरनेट सुरु होताच 'ही' गॅंग सक्रीय, कारवाई करण्यासाठी पोलिसांनी बनवला खास प्लॅन!

Violence In Manipur: असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत ज्यांचा मणिपूर हिंसाचाराशी काहीही संबंध नाही.
Manipur Violence
Manipur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Violence Latest Update: मणिपूरमध्ये इंटरनेट सुरु होताच एक धोकादायक गॅंग सक्रीय झाली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करणारे लोक बिलकुल मणिपूरचे नाहीत. पोलिस आता अशा लोकांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे.

महिलांवर अत्याचार होत आहेत. लोकांच्या हत्या होत आहेत. घरे पेटवली जात आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मणिपूरमध्ये इंटरनेट सुरु होताच, वातावरण बिघडवण्याचे कारस्थान सुरु झाले आहे.

असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत ज्यांचा मणिपूर हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. मात्र, असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अकाऊंटवर पोलिसांची करडी नजर आहे.

मणिपूर हिंसाचाराला तोंड देण्याची तयारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर हिंसाचार प्रकरणात 6000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्यामध्ये 70 प्रकरणे खुनाशी संबंधित आहेत. 700 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याचबरोबर पॅरा मिलिटरीच्या 123 कंपन्या सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या आहेत. 62 कंपन्यांचे 6 हजार 200 CRPF जवान तैनात आहेत. 12 हजार अतिरिक्त निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

मणिपूरचे (Manipur) पोलीस कर्मचारी 24 तास लक्ष ठेवून आहेत. मात्र मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात राज्य सरकारसह केंद्रीय सुरक्षा दल अपयशी ठरत आहेत.

Manipur Violence
Manipur Violence: माणुसकीला काळीमा! महिलांची विवस्त्र धिंड नंतर बलात्कार; घटनेच्या दोन महिन्यांनी प्रकार आला समोर

संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळले

विशेष म्हणजे, मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचारावर देशभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मणिपूरच्या चेकमाई येथे संतप्त जमावाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आरोपीच्या घराची जाळपोळ केली.

आणि आता घर जाळल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. महिलांसोबतच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त लोक आरोपीच्या गावात जमा झाले आणि नंतर घोषणाबाजी करत आरोपी (Accused) खुर्रेम हेरदासच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर संतप्त जमावाने खुर्रेम हेरदासच्या घरावर हल्ला केला.

Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह देणार राजीनामा? आज राज्यपालांची घेणार भेट

व्हायरल व्हिडिओवरुन ओळख

हातात काठ्या घेऊन आलेल्या महिलांनी आधी आरोपीच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर घोषणाबाजी करत त्यांच्या घराला आग लावण्यात आली. घर पेटवल्यानंतर आंदोलकांनीच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलांवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी खुर्रेम हेरदाससह 4 आरोपींना अटक केली आहे. ज्याला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके काम करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन सर्व आरोपींची ओळख पटली असल्याने लवकरच त्यांना पकडण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com