जम्मू-काश्मीरमधील(Jammu Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये(Sopore) सुरक्षा दलांनी(Indian Army) दोन दहशतवाद्यांचा(Terrorist) खात्मा(Encounter) केला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.दहशतवादी वारपोरा गावात एका घरात होता. वारपोरा भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीस प्रारंभ झाला होता. (Terrorist Encounter)
या प्रकरणावर बोलताना काश्मीरचे आयजीपी म्हणाले , 'बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्करचे दोन दहशतवादी सोपोर चकमकीदरम्यान मारले गेले असून त्यापैकी एक, फैयाज युध्द हा नागरिक आणि सुरक्षा कर्मचार्यांच्या अनेक हल्ल्यांमध्ये आणि हत्येमध्ये सामील होता. उत्तर काश्मीरमधील हिंसाचाराचा तो शेवटचा दोषी होता."
यावेळी पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाच्या वतीने वारपोरा गावाला घेराव घालण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीविषयी विशिष्ट माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू झाल्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाची गाडी पोचताच दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली होती.
तर दुसरीकडे अखनूर येथेही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे अखनूर येथे पोलिसांनी एक ड्रोन पडले आहे . पोलिसांनी ड्रोनमधून आयईडीही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या एक महिन्यापासून सतत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न सुरूच आहे . 27 जून रोजी सुद्धा येथील भारतीय हवाई दलाच्या स्टेशनवर स्फोटके सोडण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
मागील घटनांप्रमाणेच दहशतवादी हल्ले करण्यासाठी लष्कर या पद्धतीचा वापर करू शकला असता का, याची एजन्सी चौकशी करीत असून आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 कि.मी. अंतरावर हे ड्रोन सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.